यहोवाच्या साक्षीदारांना त्यांचे हे नाव कसे मिळाले?
बायबलमध्ये सांगितल्याप्रमाणे यहोवा हे देवाचे वैयक्तिक नाव आहे. (निर्गम ६:३; स्तोत्र ८३:१८) आपल्याला ज्या गोष्टींची खातरी पटली आहे त्या जाहीरपणे सांगणाऱ्या व्यक्तीला साक्षीदार म्हणतात.
आम्ही सर्वकाही निर्माण करणाऱ्याबद्दलचे अर्थात यहोवाबद्दलचे सत्य जाहीर करतो; त्यामुळे आमच्या या ख्रिश्चन समूहाला उचितपणे यहोवाचे साक्षीदार असे म्हटले जाते. (प्रकटीकरण ४:११) आमच्या वागण्याबोलण्याद्वारे तसेच बायबलमधून आम्ही जे काही शिकतो ते इतरांना सांगण्याद्वारे आम्ही त्यांना साक्ष देतो.—यशया ४३:१०-१२; १ पेत्र २:१२.