व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मुख्य विषय | हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का?

हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?

हे जग नियंत्रणात आहे की नियंत्रणाबाहेर?

२०१७ वर्षाची सुरुवात एका अतिशय निराशाजनक घोषणेने झाली. वैज्ञानिकांच्या एका गटाने जानेवारी महिन्यात अशी घोषणा केली, की हे जग आतापर्यंतच्या सर्वात भयंकर विनाशाच्या आणखीन जवळ आलं आहे. मानवजात जागतिक विनाशाच्या किती जवळ आली आहे, हे दाखवण्यासाठी त्यांनी एका प्रतीकात्मक घड्याळाचा म्हणजे ‘डूम्सडे क्लॉक’ याचा वापर केला. वैज्ञानिकांनी या घड्याळाचा मिनिट काटा ३० सेकंद पुढे सरकवला. आता या घड्याळाचे काटे मध्यरात्रीला अडीच मिनिटे कमी या वेळेवर निश्‍चित करण्यात आले आहेत; म्हणजे जागतिक विनाशाच्या अगदी जवळ. गेल्या ६० वर्षांत कधीही या घड्याळाची वेळ विनाशाच्या इतकी जवळ असल्याची निश्‍चित करण्यात आली नव्हती!

आपण जगाच्या अंताच्या किती जवळ आलो आहोत, ही गोष्ट २०१८ मध्ये वैज्ञानिक पुन्हा तपासून पाहणार आहेत. पण, लवकरच येणाऱ्‍या आणि अज्ञात असलेल्या विनाशाबद्दल डूम्सडे क्लॉक आताही इशारा देऊ शकेल का? तुम्हाला काय वाटतं? हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे का? तुम्हाला कदाचित या प्रश्‍नांची उत्तरं देणं काहीसं कठीण वाटत असेल आणि ते साहजिकच आहे. कारण, तज्ज्ञांचीही या बाबतीत वेगवेगळी मतं आहेत आणि येणाऱ्‍या डूम्सडेवर किंवा विनाशाच्या दिवसावर सर्व जण विश्‍वास ठेवतात असंही नाही.

खरंतर, लाखो लोक असा विश्‍वास करतात, की आपलं भविष्य चांगलं असेल. ते दावा करतात की पृथ्वी आणि मानव नेहमीसाठी अस्तित्वात राहतील. शिवाय, मानवांचं जीवन आताच्या तुलनेत खूप चांगलं असेल. इतकंच नाही, तर त्यांचा हा दावा पुराव्यांवर आधारित आहे असंही ते म्हणतात. पण, त्यांचे पुरावे खरंच भरवशालायक आहेत का? हे जग नियंत्रणाबाहेर गेलं आहे की नियंत्रणात आहे?