व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपण देवाला जाणून घेऊ शकतो का?

आपण देवाला जाणून घेऊ शकतो का?

आज बऱ्‍याच जणांचा देवावर विश्‍वास आहे. पण देव कोण आहे असं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला याची वेगवेगळी उत्तरं मिळतील. काहींच्या मते ज्याने सर्व काही बनवलं तो देव आहे. तर इतर काही म्हणतात, तुम्ही एका गोष्टीला किंवा व्यक्‍तीला देव मानू शकता. आणखीन काही जण म्हणतात, की देवामुळेच आपलं अस्तित्व आहे. तर इतर जण म्हणतात की त्याला आपली काळजी नाही आणि आणखीन काही म्हणतात की देवाला जाणून घेणं अशक्य आहे.

देवाला जाणून घेणं खरंच इतकं महत्त्वाचं आहे का? नक्कीच आहे. देवाला व्यक्‍तिगत रीतीने जाणल्यामुळे आपल्या जीवनाला अर्थ आणि उद्देश लाभतो. (प्रेषितांची कार्ये १७:२६-२८) तुम्ही देवाशी जितकं घनिष्ठ नातं जोडाल, तितकं तो तुमच्यावर प्रेम करेल आणि तुम्हाला मदत करेल. (याकोब ४:८) इतकंच काय तर, देवाबद्दल अचूक ज्ञान घेतल्यामुळे तुम्हाला सर्वकाळाचं जीवनही मिळेल.​—योहान १७:३.

तुम्ही देवाबद्दल कसं जाणून घेऊ शकता? अशा एखाद्या व्यक्‍तीचा विचार करा जिला तुम्ही खूप जवळून ओळखता. जसं की, तुमचा जिवलग मित्र. तुमच्या दोघांच्या मैत्रीची सुरुवात कशी झाली? कदाचित तुम्ही त्याचं नाव, त्याचे गुण, त्याच्या आवडी-निवडी, त्याने कोणकोणत्या गोष्टी केल्या आहेत, पुढे तो काय करणार आहे आणि इतरही काही गोष्टी जाणून घेतल्या असतील. या सर्व गोष्टी जाणून घेतल्यावर  तुम्ही त्याच्याशी मैत्री केली असेल.

त्याच प्रकारे पुढील प्रश्‍नांची उत्तरं मिळवल्यामुळे आपण देवाला जाणून घेऊ शकतो:

या प्रश्‍नांची बायबल आधारित उत्तरं मिळवण्यासाठी हे नियतकालिक तयार करण्यात आलं आहे. यात दिलेल्या लेखांच्या मदतीने तुम्हाला देवाबद्दल जाणून घेता येईल, इतकंच काय तर त्याच्याशी एक जवळचं नातं जोडल्यामुळे तुम्हाला कसा फायदा होईल हेही समजायला मदत होईल.