व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ओसाड जमिनीला फलदायी करण्याचे प्रयत्न

ओसाड जमिनीला फलदायी करण्याचे प्रयत्न

ओसाड जमिनीला फलदायी करण्याचे प्रयत्न

भारतातील सावध राहा! नियतकालिकाच्या लेखकाकडून

भारताच्या उत्तरेकडे लडाख या जिल्ह्यातील ओसाड प्रदेश अधिक फलदायी कसे करावेत? निवृत्त झालेले सिव्हिल इंजिनियर, त्सेवांग नोर्फल यांच्या मनात हाच प्रश्‍न होता. हिमालय पर्वतांमध्ये उंचावर असलेल्या नैसर्गिक हिमनद्या एप्रिल महिन्यात न वितळता जून महिन्यात वितळू लागतात; परंतु, एप्रिल महिन्यात पावसाचा तुटवडा असतो आणि त्याच वेळी शेतकऱ्‍यांना शेताला पाणी द्यायचे असते. नोर्फल यांना एक युक्‍ती सुचली: पर्वतावर जरा खाली कृत्रिम हिमनद्या निर्माण केल्या तर त्या लवकर वितळतील.

द वीक या भारतीय मासिकानुसार, नोर्फल आणि त्यांच्या गटाने पर्वतावरील एका नदीला दुसरीकडे वळवून ७०० फूट लांबीचा एक मानव-निर्मित कालवा तयार केला ज्याला ७० फाटे होते. या फाट्यांमधून धीम्या गतीने आणि नियंत्रित प्रमाणात पाणी वाहून पर्वतावर खालच्या भागावर बांधलेल्या धरणांपर्यंत पोहंचण्याआधीच गोठून जाणार होते. हळूहळू येथे बर्फ साचून धरणाच्या भिंती बर्फाने झाकल्या जाणार होत्या. ही हिमनदी पर्वताच्या सावलीत असल्यामुळे एप्रिलमध्ये तापमान वाढल्यावरच ती वितळणार होती आणि त्याकरवी नेमक्या त्याच दरम्यान शेतीसाठी आवश्‍यक असलेल्या पाण्याची सोय होणार होती.

मग, कृत्रिम हिमनदी निर्माण करण्याची ही कल्पना यशस्वी ठरली का? उलट, नोर्फल यांची ही कल्पना इतकी सोयीस्कर ठरली की, लडाखमध्ये अशा दहा हिमनद्या निर्माण करण्यात आल्या असून आणखी हिमनद्या तयार करण्याच्या योजना आखल्या जात आहेत. अशीच एक हिमनदी ४,५०० फुटांवर निर्माण केली असून तिच्याकरवी ९० लाख गॅलन पाण्याचा पुरवठा होतो. आणि तिचा खर्च? द वीकनुसार “कृत्रिम हिमनदी निर्माण करण्यासाठी जवळजवळ दोन महिने लागतात आणि ८०,००० रुपये [१,८६० डॉलर] इतका खर्च येतो; यांतला बहुतेक खर्च मजुरीचा आहे.”

मानवाची कल्पकता कारणी लावल्यास निश्‍चितच फायदेकारक ठरू शकते. देवाच्या स्वर्गीय राज्याच्या मार्गदर्शनाखाली मानवजातीला आणखी किती गोष्टी साध्य करता येतील याचा विचार करा! बायबल असे वचन देते: “अरण्य व रुक्ष भूमि ही हर्षतील; वाळवंट उल्लासेल व कमलाप्रमाणे फुलेल. . . . रानांत जलप्रवाह वाळवंटात झरे फुटतील.” (यशया ३५:१,) पृथ्वीचे सौंदर्य वाढवण्यात हातभार लावणे किती आनंददायक असेल! (g०१ ४/८)

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

Arvind Jain, The Week Magazine

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.