यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे”
यहोवाचा “शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे”
“देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
१, २. यहोवाच्या सेवकांपैकी काहींना नकारात्मक भावनांशी का झगडावे लागते?
बार्बरा * आपल्या अगदी मनातले बोलून दाखवते. ती म्हणते: “मी जवळजवळ ३० वर्षांपासून यहोवाची साक्षीदार आहे. पण स्वतःला यहोवाची साक्षीदार म्हणवून घ्यायला आपण लायक आहोत असं मला कधीही वाटलं नाही. मी काही काळ पायनियर होते आणि इतरही अनेक विशेषाधिकार मला मिळाले, पण तरीपण आपण साक्षीदार म्हणवून घेण्यास लायक आहोत असं मनापासून मला कधीच वाटलं नाही.” कीथ यानेही अशाच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणतो, “यहोवाचा सेवक म्हणवून घेण्यास आपण लायक नाही असं मला अनेकदा वाटायचं कारण यहोवाच्या सेवकांजवळ आनंदी असण्याची अनेक कारणं असतात, पण मी आनंदी नव्हतो. यामुळे माझ्या मनात दोषीपणाच्या भावना येऊ लागल्या आणि त्यामुळे मी आणखीनच दुःखी झालो.”
२ गतकाळात आणि आधुनिक काळातही यहोवाच्या विश्वासू सेवकांपैकी बऱ्याच जणांना अशा भावनांशी झगडावे लागले आहे. तुम्हालाही कधीकधी असे वाटते का? कदाचित तुमच्यापुढे एकापाठोपाठ अनेक समस्या येत असतील पण तुमचे सहविश्वासू बांधव मात्र कोणत्याही समस्येशिवाय अगदी मजेत, आनंदात राहात आहेत असे तुम्हाला भासत असेल. यामुळे तुम्हाला कदाचित असे वाटत असेल की कदाचित यहोवाची कृपा आपल्यावर नाही, किंवा त्याने आपल्याकडे लक्ष द्यावे याकरता आपण लायकच नाही. पण लगेच असा निष्कर्ष काढू नका. बायबल आपल्याला आश्वासन देते: “[यहोवाने] पीडिताची दैन्यावस्था तुच्छ लेखिली नाही व तिचा वीट मानिला स्तोत्र २२:२४) मशीहाबद्दल असलेले हे भविष्यसूचक शब्द दाखवतात की यहोवा आपल्या विश्वासू जनांच्या केवळ प्रार्थनाच ऐकत नाही तर तो त्यांना प्रतिफळही देतो.
नाही. त्याने आपले मुख त्याच्या दृष्टिआड केले नाही; तर त्याने धावा केला तेव्हा त्याने तो ऐकला.” (३. सध्याच्या या जगाच्या दबावांपासून आपणही का सुटलेलो नाही?
३ सध्याच्या या जगातील दबावांतून कोणीही सुटलेले नाही. यहोवाचे लोकही याला अपवाद नाहीत. आपण अशा एका जगात राहात आहोत की जे यहोवाचा प्रमुख शत्रू दियाबल सैतान याच्या नियंत्रणात आहे. (२ करिंथकर ४:४; १ योहान ५:१९) त्यामुळे, चमत्कारिक संरक्षण मिळण्याऐवजी यहोवाचे सेवक खरे तर सैतानाचे मुख्य लक्ष्य बनले आहेत. (ईयोब १:७-१२; प्रकटीकरण २:१०) म्हणून, देवाची नियुक्त वेळ येईपर्यंत आपण ‘संकटात धीर धरणे’ व ‘प्रार्थनेत तत्पर राहणे’ अगत्याचे आहे. यहोवाला आपली काळजी आहे याबद्दल आपण आत्मविश्वास बाळगला पाहिजे. (रोमकर १२:१२) आपला देव, यहोवा याचे आपल्यावर प्रेम नाही असा आपण कधीही विचार करू नये!
धीर धरणाऱ्यांची प्राचीन उदाहरणे
४. दुःखदायक परिस्थितीत ज्यांनी धीर धरला अशा काही यहोवाच्या विश्वासू सेवकांची उदाहरणे सांगा.
४ यहोवाच्या अनेक प्राचीन सेवकांना दुःखदायक परिस्थितीला तोंड द्यावे लागले. उदाहरणार्थ, हन्नाला मूल नसल्यामुळे तिचे “मन व्यथित” झाले होते; तिच्या दृष्टिकोनातून तिला मूल नसणे हे देवाला तिची आठवण नसल्याप्रमाणे होते. (१ शमुवेल १:९-११) दुष्ट ईजबेल राणी जेव्हा एलीयाचा जीव घेण्यासाठी त्याचा पाठलाग करीत होती तेव्हा तो अतिशय घाबरला आणि त्याने यहोवाला अशी प्रार्थना केली: “आता पुरे झाले, माझा अंत कर; मी आपल्या वाडवडिलांहून काही चांगला नाही.” (१ राजे १९:४) आणि प्रेषित पौलानेही अपरिपूर्णतेच्या दबावामुळे अगदी खचून जाऊन असे कबूल केले असावे: “जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच.” त्याने पुढे म्हटले: “किती मी कष्टी माणूस!”—रोमकर ७:२१-२४.
५. (क) हन्ना, एलीया व पौल यांना कोणते प्रतिफळ मिळाले? (ख) जर आपल्या मनांत नकारात्मक भावना येत असतील तर आपण देवाच्या वचनातून कशाप्रकारे सांत्वन मिळवू शकतो?
५ अर्थात, हन्ना, एलीया व पौल या सर्वांनी यहोवाच्या सेवेत धीर धरला आणि त्याने त्यांना मोठे प्रतिफळ दिले. (१ शमुवेल १:२०; २:२१; १ राजे १९:५-१८; २ तीमथ्य ४:८) तरीसुद्धा त्यांना दुःख, निराशा व भीती अशा सर्व प्रकारच्या मानवी भावनांशी झगडावे लागले. तेव्हा काही वेळा आपल्या मनातही नकारात्मक भावना येतात याचे आपल्याला नवल वाटू नये. पण जेव्हा जीवनाच्या चिंतांनी दबून गेल्यावर, ‘यहोवाचे खरोखरच आपल्यावर प्रेम असेल का?’ असा विचार तुमच्या मनात येतो तेव्हा तुम्ही काय करू शकता? तुम्ही देवाच्या वचनातून सांत्वन मिळवू शकता. उदाहरणार्थ, याआधीच्या लेखात आपण येशूच्या या विधानाविषयी चर्चा केली की यहोवाने आपल्या “डोक्यावरले सर्व केस देखील मोजलेले आहेत.” (मत्तय १०:३०) या शब्दांतून आपल्याला प्रोत्साहन मिळते आणि त्यांवरून हे दिसून येते की यहोवाला त्याच्या प्रत्येक सेवकाबद्दल मनापासून आस्था वाटते. येशूने दिलेल्या चिमण्यांच्या उदाहरणाचाही विचार करा. जर त्या लहानशा पक्ष्यांपैकी एकही यहोवाच्या नकळत जमिनीवर पडत नाही, तर मग तुमच्या संकटाकडे तो का म्हणून दुर्लक्ष करील?
६. नकारात्मक भावनांशी झगडणाऱ्यांना बायबलमधून कशाप्रकारे सांत्वन मिळू शकते?
६ आपण अपरिपूर्ण मानव, सर्वसमर्थ निर्माणकर्ता यहोवा देव याच्या दृष्टीने खरोखरच मौल्यवान असू शकतो का? होय! किंबहुना, बायबलमध्ये असे अनेक उतारे आहेत की जे या गोष्टीची आपल्याला खात्री पटवून देतात. जेव्हा आपण त्यांवर मनन करतो तेव्हा आपण स्तोत्रकर्त्याप्रमाणेच असे म्हणू शकतो: “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.” (स्तोत्र ९४:१९) तर आता आपण देवाच्या वचनातील काही सांत्वनदायक विधाने विचारात घेऊ या. त्यामुळे, देवाच्या दृष्टीने आपण मौल्यवान आहोत आणि आपण त्याची इच्छा करत राहिल्यास तो आपल्याला प्रतिफळ देईल हे आणखी चांगल्याप्रकारे समजण्यास आपल्याला मदत मिळेल.
यहोवाचा “खास निधि”
७. भ्रष्ट यहुदी राष्ट्राला यहोवाने मलाखीच्या माध्यमाने कोणती प्रोत्साहनदायक भविष्यवाणी केली?
७ सा.यु.पू. पाचव्या शतकात यहुदी, शोचनीय परिस्थितीत होते. याजक बलिदानासाठी सदोष पशू स्वीकारून यहोवाच्या वेदीवर अर्पण करत होते. न्यायाधीश तोंड पाहून न्याय करत होते. भूतविद्या, लबाडी, फसवणूक, व व्यभिचार यांसारखे प्रकार बोकाळले होते. (मलाखी १:८; २:९; ३:५) या पूर्णपणे भ्रष्ट झालेल्या राष्ट्रात मलाखीने एक आश्चर्यकारक भविष्यवाणी केली. ती अशी, की कालांतराने यहोवा आपल्या लोकांना पुन्हा चांगल्या स्थितीत आणेल. आपण वाचतो: “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी नेमीन त्या दिवशी ते माझा खास निधि होतील; जसा कोणी आपली सेवाचाकरी करणाऱ्या पुत्रावर दया करितो तसा मी त्यांजवर दया करीन.”—मलाखी ३:१७.
८. मलाखी ३:१७ यातील तत्त्व मोठ्या लोकसमुदायालाही का लागू करता येते?
८ आधुनिक दिवसांत मलाखीच्या भविष्यवाणीची पूर्णता, आत्म्याने अभिषिक्त झालेल्या व १,४४,००० जणांच्या आध्यात्मिक राष्ट्राचे सदस्य असलेल्या ख्रिश्चनांच्या संबंधाने होते. हे राष्ट्र खरोखरच यहोवाचा “खास निधि” किंवा “देवाचे स्वतःचे लोक” आहेत. (१ पेत्र २:९) मलाखीची भविष्यवाणी ‘शुभ्र झगे परिधान करून राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभे राहिलेल्या मोठ्या लोकसमुदायाच्या’ सदस्यांनाही प्रोत्साहन देते. (प्रकटीकरण ७:४, ९) अभिषिक्त ख्रिश्चनांसोबत मिळून, येशू ख्रिस्त या एकाच मेंढपाळाच्या देखरेखीखाली ते एक कळप बनतात.—योहान १०:१६.
९. यहोवाचे लोक त्याच्या नजरेत एक “खास निधि” का आहेत?
९ यहोवाची सेवा करण्याचा निर्णय घेतलेल्यांना तो कोणत्या दृष्टीने पाहतो? मलाखी ३:१७ यात म्हटल्याप्रमाणे, तो त्यांच्याकडे तशाच दृष्टीने पाहतो जशा दृष्टीने एक प्रेमळ पिता आपल्या मुलाकडे पाहतो. आपल्या लोकांचे वर्णन करण्याकरता त्याने किती सुरेख संज्ञा वापरली आहे याकडे लक्ष द्या—“खास निधि.” इतर भाषांतरांत याचे भाषांतर, “माझे स्वतःचे,” “माझी सर्वात मोलाची संपत्ती” व “माझी रत्ने” असे केले आहे. आपली सेवा करणाऱ्यांना यहोवा इतके विशेष का लेखतो? एक तर, तो कृतज्ञ देव आहे. (इब्री लोकांस ६:१०) जे मनापासून त्याची सेवा करतात त्यांच्या तो जवळ जातो आणि त्यांना आपले खास लोक समजतो.
१०. यहोवा आपल्या लोकांना कशाप्रकारे संरक्षण पुरवतो?
१० तुमच्या मालकीच्या सर्व वस्तूंपैकी तुम्हाला खास मोलाची वाटणारी एखादी वस्तू आहे का? ही वस्तू तुम्ही विशेष जपता, नाही का? यहोवाही आपल्या ‘खास निधीचे’ अशाचप्रकारे संरक्षण करतो. अर्थात, तो जीवनातल्या सर्व परीक्षांपासून व दुःखांपासून त्यांचे संरक्षण करत नाही. (उपदेशक ९:११) पण आध्यात्मिक दृष्ट्या तो आपल्या लोकांचे संरक्षण करू शकतो आणि करील. तो त्यांना कोणत्याही परीक्षेला तोंड देण्याकरता लागणारे सामर्थ्य देतो. (१ करिंथकर १०:१३) म्हणूनच, मोशेने देवाच्या प्राचीन काळातील लोकांना, इस्राएलांना असे सांगितले: “खंबीर हो, हिंमत धर, . . . कारण तुझ्याबरोबर चालणारा तुझा देव परमेश्वर हा आहे; तो तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणारहि नाही.” (अनुवाद ३१:६) यहोवा आपल्या लोकांना प्रतिफळ देतो. त्याच्याकरता ते एक “खास निधि” आहेत.
“प्रतिफळ देणारा” यहोवा
११, १२. यहोवा प्रतिफळ देणारा उदार देव आहे हे ओळखल्याने आपल्याला शंकाकुशंकांना तोंड देण्यास कशी मदत मिळू शकते?
११ यहोवाचे सेवक त्याच्याकरता मोलाचे आहेत याचा आणखी एक पुरावा म्हणजे तो त्यांना प्रतिफळ देतो. त्याने इस्राएलांना असे सांगितले: “सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा म्हणजे मी आकाशकपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढा आशीर्वाद तुम्हाकरिता वर्षितो की नाही याविषयी माझी प्रतीति पाहा.’” (मलाखी ३:१०) शेवटी यहोवा आपल्या सेवकांना सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ देईल. (योहान ५:२४; प्रकटीकरण २१:४) या अनमोल प्रतिफळाचा विचार केल्यावर यहोवाचे प्रेम व उदारता आपल्याला दिसून येते. यावरून हेही दिसून येते की जे यहोवाची सेवा करण्याची निवड करतात त्यांची तो मनापासून कदर करतो. यहोवा प्रतिफळ देणारा उदार देव आहे हे ओळखल्याने, देवापुढे आपल्या योग्यतेविषयीच्या शंकाकुशंकांना तोंड देण्यास आपल्याला मदत मिळू शकते. किंबहुना, यहोवा प्रतिफळ देणारा आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहण्याचा तो स्वतः आपल्याला आग्रह करतो. पौलाने लिहिले: “देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे, आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे.”—इब्री लोकांस ११:६.
१२ अर्थात आपण यहोवाची सेवा, केवळ तो आपल्याला प्रतिफळ देण्याचे वचन देतो म्हणून नव्हे तर आपले त्याच्यावर प्रेम असल्यामुळे करतो. तरीपण, प्रतिफळाची आशा सतत डोळ्यापुढे ठेवणे हे अयोग्य, किंवा स्वार्थीपणाचे चिन्ह नाही. (कलस्सैकर ३:२३, २४) आपल्या लोकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमामुळे व त्यांची तो मनापासून कदर करत असल्यामुळे यहोवा स्वतः पुढाकार घेऊन त्याचा झटून शोध करणाऱ्या सर्वांना प्रतिफळ देतो.
१३. खंडणीची तरतूद ही यहोवा मानवजातीची कदर करतो याचा सर्वात मोठा पुरावा का आहे?
१३ यहोवा मानवजातीची किती कदर करतो याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्याने केलेली खंडणीची तरतूद. प्रेषित योहानाने लिहिले: “देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) येशू ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाची तरतूद, आपण यहोवाच्या नजरेत कवडीमोल आहोत किंवा त्याचे आपल्यावर प्रेम नाही या कल्पनेचे खंडन करते. कारण जर यहोवाने आपल्याकरता इतकी मोठी किंमत दिली—आपला एकुलता एक पुत्र दिला—तर मग नक्कीच त्याचे आपल्यावर मनस्वी प्रेम असले पाहिजे.
१४. पौलाचा खंडणीबद्दल काय दृष्टिकोन होता हे कशावरून दिसून येते?
१४ त्यामुळे, तुमच्या मनात कधी नकारात्मक भावना येऊ लागल्यास खंडणीविषयी मनन करा. होय यहोवाने ही खास तुमच्यासाठी केलेली तरतूद आहे या दृष्टिकोनाने विचार करा. प्रेषित पौलाने हेच केले. त्याने काय म्हटले होते हे आठवा: “किती मी कष्टी माणूस!” पण नंतर मात्र पौलाने म्हटले: “आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे मी देवाचे आभार मानतो” कारण “त्याने माझ्यावर प्रीति केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.” (रोमकर ७:२४, २५; गलतीकर २:२०) असे म्हणताना पौल स्वतःला फाजील महत्त्व देत नव्हता. तर त्याला हा विश्वास होता की यहोवा एक व्यक्ती म्हणून आपली कदर करतो. पौलाप्रमाणे तुम्हीसुद्धा खंडणी ही देवाकडून खास तुम्हाला मिळालेली देणगी आहे असा विचार करण्यास शिकले पाहिजे. यहोवा हा सामर्थ्यशाली तारणकर्ताच नव्हे तर प्रेमळपणे प्रतिफळ देणारा देखील आहे.
सैतानाच्या ‘डावपेचांपासून’ सावध राहा
१५-१७. (क) दियाबल नकारात्मक भावनांचा कशाप्रकारे फायदा उचलतो? (ख) ईयोबाच्या अनुभवावरून आपल्याला कोणते प्रोत्साहन मिळते?
१५ इतके करूनही कदाचित, देवाच्या वचनातील सांत्वनदायक उतारे आपल्या बाबतीत खरे आहेत यावर विश्वास ठेवणे तुम्हाला कठीण वाटत असेल. कदाचित तुम्हाला वाटत असेल की देवाच्या नव्या जगात सर्वकाळ जगण्याचे प्रतिफळ इतरजण मिळवू शकतात पण आपण मात्र त्याकरता लायक नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल, तर तुम्ही काय करू शकता?
१६ पौलाने इफिसकरांना दिलेला हा इशारा तुम्हाला माहीत असेल: “सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हाला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा.” (इफिसकर ६:११) आपण सैतानाच्या डावपेचांचा विचार करतो तेव्हा सहसा आपल्या मनात भौतिकवाद व अनैतिकता यांसारख्या गोष्टी चटकन येतात आणि हे योग्य आहे. कारण या मोहांनाच बळी पडून प्राचीन काळात व आपल्या काळातही देवाचे अनेक सेवक विश्वासातून पडले आहेत. पण आपण सैतानाच्या आणखी एका डावपेचाकडे दुर्लक्ष करू नये—अर्थात, त्याचे लोकांना अशी खात्री पटवून देणे की यहोवा देवाचे त्यांच्यावर प्रेम नाही.
१७ लोकांना देवापासून दूर नेण्याकरता अशाप्रकारच्या नकारात्मक भावनांचा फायदा उचलण्यात सैतान तरबेज आहे. ईयोब २५:४-६; योहान ८:४४) हे शब्द ऐकल्यावर ईयोब किती खचून गेला असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? तेव्हा, तुमचे मनोबल खचवण्यात सैतानाला सफल होऊ देऊ नका. त्याउलट सैतानाचे डावपेच ओळखा, म्हणजे योग्य मार्गाने चालत राहण्याकरता आणखी कसोशीने प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला धैर्य व ताकद मिळेल. (२ करिंथकर २:११) ईयोबाच्या बाबतीत, जरी यहोवाला त्याला ताडन द्यावे लागले तरीसुद्धा त्याने ईयोबाला त्याच्या धीराचे प्रतिफळ दिले व जे काही त्याने गमवले होते त्याच्या दुप्पट त्याला परत दिले.—ईयोब ४२:१०.
बिल्दाद याने ईयोबाला काय म्हटले होते हे आठवा: “मर्त्य मानव देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला पुरुष निर्मळ कसा ठरेल? पाहा, त्याच्या दृष्टीने चंद्रहि निस्तेज आहे, आणि तारेहि निर्मळ नाहीत. तर मर्त्य मानव, जो केवळ कीटक, मानवपुत्र जो केवळ कृमि, त्याची काय कथा!” (यहोवा ‘आपल्या मनापेक्षा थोर आहे’
१८, १९. कोणत्या अर्थाने, “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे” आणि त्याला “सर्व काही कळते” असे आपण का म्हणू शकतो?
१८ निराशेच्या भावना, खासकरून त्या आपल्या मनात खोलवर रुजलेल्या असतील तर त्या काढून टाकणे तितके सोपे नसते. तरीपण, यहोवाचा आत्मा तुम्हाला हळूहळू ‘देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकण्यास’ मदत करू शकतो. (२ करिंथकर १०:४, ५) जेव्हा नकारात्मक भावना तुमच्या मनावर कब्जा मिळवू लागतात तेव्हा प्रेषित योहानाच्या या शब्दांवर मनन करा: “आपण सत्याचे आहो हे ह्यावरुन आपल्याला कळून येईल; आणि ज्या कशाविषयी आपले मन आपल्या स्वतःला दोषी ठरविते त्याविषयी आपण स्वतःच्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ; कारण आपल्या मनापेक्षा देव थोर आहे; त्याला सर्व काही कळते.”—१ योहान ३:१९, २०.
१९ “आपल्या मनापेक्षा देव थोर आहे” या वाक्यांशाचा काय अर्थ होतो? कधीकधी आपले मन आपल्याला दोषी ठरवते. आपल्या अपरिपूर्णता व चुकांची आपल्याला प्रकर्षाने जाणीव होते तेव्हा विशेषतः आपले मन आपल्याला बोचणी करते. किंवा आपल्या विशिष्ट पार्श्वभूमीमुळे आपली सतत स्वतःविषयी नकारात्मक दृष्टिकोनानेच विचार करण्याची प्रवृत्ती असेल. आपण काहीही केले तरी ते यहोवाने स्वीकारण्यास योग्य ठरणार नाही असे आपल्याला कदाचित वाटत असेल. प्रेषित योहानाचे शब्द आपल्याला आश्वासन देतात की यहोवा यापेक्षा थोर आहे! तो आपल्या चुकांच्या पलीकडे पाहतो आणि आपण मुळात काय करण्यास सक्षम आहोत हे पाहतो. तसेच तो आपले हेतू व इच्छा देखील जाणतो. दाविदाने लिहिले: “तो आमची प्रकृति जाणतो; आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो.” (स्तोत्र १०३:१४) होय, आपण स्वतःही ओळखत नाही तितक्या चांगल्याप्रकारे यहोवा आपल्याला ओळखतो!
“शोभायमान मुकुट”
२०. इस्राएलच्या पुनर्वसनाच्या भविष्यवाणीतून यहोवा आपल्या सेवकांना कोणत्या दृष्टीने पाहतो याविषयी काय प्रकट होते?
२० संदेष्टा यशयाद्वारे यहोवाने आपल्या प्राचीन काळातील लोकांना आशा दिली की ते पुन्हा आपल्या देशात वस्ती करतील. बॅबिलोनच्या बंदिवासात असताना हे सांत्वन व हा दिलासा त्या निराश झालेल्या लोकांकरता अतिशय समयोचित ठरला असावा! ते आपल्या मायदेशी परततील त्या समयाविषयी यहोवाने म्हटले: “तू परमेश्वराच्या हाती शोभायमान मुकुट होशील.” (यशया ६२:३) असे म्हणून यहोवाने आपल्या लोकांना जणू आदराने व ऐश्वर्याने सुशोभित केले. आज त्याने आत्मिक इस्राएलच्या बाबतीतही हेच केले आहे. जणू सर्वांनी पाहून प्रशंसा करावी म्हणून त्याने त्यांना उंच धरले आहे.
२१. विश्वासूपणे धीर धरल्याबद्दल यहोवा तुम्हाला प्रतिफळ देईल ही खात्री तुम्ही केव्हा बाळगू शकाल?
२१ या भविष्यवाणीची प्रथम पूर्णता अभिषिक्तांच्या बाबतीत होत असली तरी यहोवाची सेवा करणाऱ्या सर्वांचा तो किती आदर करतो हे यावरून स्पष्ट होते. तेव्हा, आपल्या मनात शंकाकुशंका डोकावतात तेव्हा आपण हे आठवणीत ठेवावे की जरी आपण अपरिपूर्ण असलो तरीही आपण यहोवाच्या दृष्टीने एका ‘शोभायमान मुकुटाप्रमाणे’ मौल्यवान आहोत. तेव्हा यहोवाची इच्छा करण्यास झटत राहण्याद्वारे त्याचे मन आनंदित करत राहा. (नीतिसूत्रे २७:११) असे केल्यास, तुम्ही ही खात्री बाळगू शकता की विश्वासूपणे धीर धरल्याबद्दल यहोवा तुम्हाला अवश्य प्रतिफळ देईल! (w०५ ८/१)
[तळटीप]
^ परि. 1 काही नावे बदलण्यात आली आहेत.
तुम्हाला आठवते का?
• आपण कोणत्या अर्थाने यहोवाचा “खास निधि” आहोत?
• यहोवा प्रतिफळ देणारा आहे हे ओळखणे का महत्त्वाचे आहे?
• सैतानाच्या कोणत्या ‘डावपेचांपासून’ आपण सावध राहिले पाहिजे?
• देव कशाप्रकारे ‘आपल्या मनापेक्षा थोर आहे?’
[अभ्यासाचे प्रश्न]
[२८ पानांवरील चित्र]
पौल
[२८ पानांवरील चित्र]
एलीया
[२८ पानांवरील चित्र]
हन्ना