ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
“धन्य परमेश्वराचे नाम!”—ईयो. १:२१.
१. ईयोबाचे पुस्तक कोणी व केव्हा लिहिले होते?
मोशेने फारोच्या भीतीने इजिप्त सोडले आणि मिद्यानात आश्रय घेतला तेव्हा तो जवळपास ४० वर्षांचा होता. (प्रे. कृत्ये ७:२३) तेथे असताना त्याने जवळच्याच ऊस देशात राहणाऱ्या ईयोबावर जी संकटे आली होती त्यांबद्दल ऐकले असावे. त्यानंतर कित्येक वर्षांनी, अरण्यातील प्रवासाच्या शेवटल्या टप्प्यात मोशे आणि सबंध इस्राएल राष्ट्र ऊस देशाच्या जवळ असताना मोशेला ईयोबाच्या नंतरच्या आयुष्यात काय घडले हे समजले असावे. मोशेने ईयोबाचे पुस्तक ईयोबाच्या मृत्यूनंतर लिहिले होते असे यहुदी लोक मानतात.
२. आधुनिक काळातील यहोवाच्या सेवकांना ईयोबाच्या पुस्तकातून कशा प्रकारे प्रोत्साहन मिळते?
२ ईयोबाचे पुस्तक आधुनिक काळातील देवाच्या सेवकांचा विश्वास मजबूत करते. ते कशा प्रकारे? अहवालाच्या सुरुवातीलाच आपल्याला स्वर्गात घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या व दूरगामी परिणाम असलेल्या घटनांविषयी माहिती मिळते. तसेच, या विश्वावर आधिपत्य करण्याच्या देवाच्या हक्कासंबंधी जो वाद एदेन बागेत उठवण्यात आला होता त्यावर हा अहवाल भर देतो. शिवाय, देवाला एकनिष्ठ राहण्याचा काय अर्थ होतो आणि यहोवा कधीकधी आपल्या सेवकांवर संकटे का येऊ देतो हे देखील ईयोबाच्या अहवालातून आपल्याला आणखी स्पष्टपणे कळते. शिवाय, दियाबल सैतान हा यहोवाचा प्रमुख विरोधक आणि मानवजातीचा शत्रू आहे यावरही ईयोबाच्या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे. या पुस्तकातून हेही दिसते की ईयोबासारखे अपरिपूर्ण मनुष्य अतिशय कठीण परीक्षांना तोंड द्यावे लागले तरी यहोवाला शेवटपर्यंत विश्वासू राहू शकतात. तर आता आपण ईयोबाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या काही घटनांचे परीक्षण करू या.
सैतानाने ईयोबाची परीक्षा घेतली
३. ईयोबाबद्दल आपल्याला काय माहीत आहे आणि सैतानाने त्याला आपले निशाण का बनवले?
३ ईयोब एक श्रीमंत व प्रतिष्ठित मनुष्य होता. तो एका मोठ्या कुटुंबाचा प्रमुख व एक चारित्र्यवान पुरुष होता. समाजात त्याच्या शब्दाला मान होता. तो गरजू व्यक्तींना मदत करत असे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ईयोब देवभीरू माणूस होता. “तो सात्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही,” असे त्याच्याबद्दल सांगितले आहे. पण, तो श्रीमंत असल्यामुळे किंवा समाजात त्याला मानाचे स्थान असल्यामुळे नव्हे, तर तो देवाचा भक्त असल्यामुळे दियाबल सैतानाच्या हल्ल्यांचे निशाण बनला.—ईयो. १:१; २९:७-१६; ३१:१.
४. सात्विकता म्हणजे काय?
४ ईयोबाच्या पुस्तकाच्या सुरुवातीला, स्वर्गात झालेल्या एका सभेचे वर्णन करण्यात आले आहे. त्या सभेत स्वर्गदूत यहोवासमोर येऊन उभे राहतात असे सांगण्यात आले आहे. सैतान देखील तेथे उपस्थित होतो आणि तो ईयोबावर आरोप लावतो. (ईयोब १:६-११ वाचा.) सैतानाने ईयोबाच्या धनसंपत्तीचा उल्लेख केला असला, तरी त्याने प्रामुख्याने ईयोबाच्या सात्विकतेबद्दल शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एकनिष्ठा किंवा ‘सात्विकता’ या शब्दाचा अर्थ सरळ, निष्कलंक, नीतिमान, आणि निर्दोष असणे असा होतो. बायबलमध्ये, सात्विकता हा शब्द पूर्ण हृदयाने यहोवाला समर्पित असण्यास सूचित करतो.
५. सैतानाने ईयोबाबद्दल कोणता दावा केला?
५ सैतानाने दावा केला की ईयोब देवाची उपासना सात्विकतेमुळे करत नाही, तर स्वार्थामुळे करतो. सैतानाचे म्हणणे होते की यहोवा जोपर्यंत ईयोबाला आशीर्वाद देत राहील व त्याचे संरक्षण करत राहील तोपर्यंतच ईयोब देवाप्रती एकनिष्ठ राहील. सैतानाचा आरोप खोटा ठरवण्यासाठी यहोवाने सैतानाला विश्वासू ईयोबावर संकटे आणण्याची परवानगी दिली. परिणामस्वरूप, एकाच दिवशी ईयोबाला आपली गुरेढोरे चोरण्यात आल्याची किंवा नष्ट झाल्याची, आपल्या सेवकांचा वध करण्यात आल्याची, आणि आपल्या दहा मुला-मुलींचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली. (ईयो. १:१३-१९) सैतानाच्या हल्ल्यांपुढे ईयोबाने हात टेकले का? ईयोबाच्या पुस्तकातील देवप्रेरित अहवालानुसार ईयोबाने आपल्यावर आलेल्या संकटांबद्दल असे म्हटले: “परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”—ईयो. १:२१.
६. (क) स्वर्गात पुन्हा एकदा सभा झाली तेव्हा काय घडले? (ख) सैतानाने यहोवाप्रती ईयोबाच्या सात्विकतेबद्दल शंका घेतली तेव्हा तो कोणाविषयी बोलत होता?
ईयो. २:१-८) पण ईयोबावर आलेली संकटे एवढ्यावरच संपली नाहीत.
६ नंतर, स्वर्गात आणखी एक सभा झाली. यावेळीही सैतानाने ईयोबावर आरोप करत असे म्हटले: “त्वचेसाठी त्वचा! मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल. तू आपला हात पुढे करून त्याच्या हाडामांसास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.” यावेळी सैतान केवळ ईयोबावर आरोप करत नव्हता याकडे लक्ष द्या. “मनुष्य आपल्या प्राणासाठी आपले सर्वस्व देईल” असे म्हणण्याद्वारे, सैतानाने फक्त ईयोबाच्याच नव्हे तर यहोवाची उपासना करणाऱ्या प्रत्येक मनुष्याच्या सात्विकतेबद्दल शंका व्यक्त केली. त्यानंतर, यहोवाने ईयोबास एका वेदनादायी रोगाने पीडित करण्याची सैतानाला परवानगी दिली. (ईयोबाकडून शिकण्यासारखा धडा
७. ईयोबाच्या पत्नीने व त्याला भेटण्यासाठी आलेल्या लोकांनी त्याच्यावर कशा प्रकारे दबाव आणला?
७ सुरुवातीला, ईयोबाला जे दुःख सहन करावे लागले तेच त्याच्या पत्नीलाही करावे लागले. आपली मुले व धनसंपत्ती गमावल्यामुळे ती पार उद्ध्वस्त झाली असावी. आपल्या पतीला एका वेदनादायी रोगाने पीडित झालेले पाहून तिला खूप दुःख झाले असेल. ती अगतिकपणे ईयोबाला म्हणाली: “तुम्ही अजून सत्व धरून राहिला आहा काय? देवाचे नाव सोडून द्या आणि मरून जा.” नंतर, अलीफज, बिल्दद आणि सोफर हे तिघे ईयोबाचे सांत्वन करण्याच्या निमित्ताने तेथे आले. पण, त्यांच्या दिशाभूल करणाऱ्या तर्कवादामुळे ते “भिकार सांत्वनकर्ते” ठरले. उदाहरणार्थ, बिल्ददाने असे सुचवले की ईयोबाच्या मुलांनी पाप केले असल्यामुळे त्यांच्यासोबत जे घडले ते योग्यच होते. अलीफजाने धूर्तपणे म्हटले की ईयोब आपल्या भूतकाळातील पापांचे फळ भोगत आहे. शिवाय, सात्विकपणे वागणाऱ्यांची देवाला खरेच कदर आहे का, याविषयीही त्याने शंका व्यक्त केली. (ईयो. २:९, ११; ४:८; ८:४; १६:२; २२:२, ३) या सगळ्या आरोपांमुळे मानसिक दबावाखाली असतानाही ईयोबाने आपली सात्विकता सोडली नाही. “ईयोबाने देवाला निर्दोषी ठरविण्याचे सोडून स्वतःस निर्दोषी ठरवावयास पाहिले” तेव्हा त्याचे चुकले हे खरे आहे. (ईयो. ३२:२) तरीसुद्धा, या सगळ्यातून जात असतानाही तो शेवटपर्यंत देवाला विश्वासू राहिला.
८. इतरांना सल्ला देणाऱ्यांसाठी अलीहूने कोणते उत्तम उदाहरण मांडले?
८ यानंतर, आपण अलीहूबद्दल वाचतो. तो देखील ईयोबाला भेटण्यासाठी आला होता. अलीहूने आधी ईयोबाचा आणि त्याला भेटण्यास आलेल्या तिघांचा तर्कवाद ऐकून घेतला. त्या चौघांपैकी वयाने लहान असूनही अलीहूने त्यांच्यापेक्षा जास्त सुज्ञता दाखवली. तो ईयोबाशी प्रेमळपणे व आदराने बोलला. अलीहूने ईयोबाच्या चांगल्या आचरणाबद्दल त्याची प्रशंसा तर केली पण, त्याने हेही म्हटले की ईयोबाने स्वतःला निर्दोष शाबित करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले आहे. नंतर, अलीहूने ईयोबाला आश्वासन दिले की विश्वासूपणे देवाची सेवा करणे नेहमीच हितकारक असते. (ईयोब ३६:१, ११ वाचा.) आज ज्यांना इतरांना सल्ला द्यावा लागतो त्यांच्यासाठी अलीहूचे उदाहरण किती उत्तम आहे! अलीहूने धीर दाखवला, लक्षपूर्वक ऐकून घेतले, योग्य तेव्हा प्रशंसा केली आणि प्रोत्साहनदायक सल्ला दिला.—ईयो. ३२:६; ३३:३२.
९. यहोवाने ईयोबाची मदत कशा प्रकारे केली?
९ शेवटी, ईयोबाशी खुद्द यहोवाच बोलला! अहवालात असे म्हटले आहे: “परमेश्वराने वावटळीतून ईयोबास उत्तर दिले.” यहोवाने अनेक प्रश्न विचारून, प्रेमळपणे, पण सडेतोड शब्दांत ईयोबाला आपली विचारसरणी बदलण्यास साहाय्य केले. ईयोबाने नम्रपणे हे ताडन स्वीकारले आणि म्हटले: “मी तर पामर आहे . . . मी माघार घेऊन धूळराखेत बसून पश्चात्ताप करीत आहे.” ईयोबाशी बोलल्यानंतर, यहोवाने त्याच्या मित्रांबद्दल आपला क्रोध व्यक्त केला, कारण त्यांचे ‘बोलणे यथार्थ’ किंवा खरे नव्हते. यहोवाने ईयोबाला त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. “ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दुःखाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली.”—यहोवावर आपण मनापासून प्रेम करतो का?
१०. यहोवाने सैतानाच्या आरोपांकडे दुर्लक्ष का केले नाही किंवा त्याचा नाश का केला नाही?
१० यहोवा सृष्टीचा निर्माणकर्ता व सार्वभौम अधिपती आहे. तर मग, त्याने दियाबलाच्या आरोपांकडे दुर्लक्ष का केले नाही? देवाला माहित होते की सैतानाकडे दुर्लक्ष केल्याने किंवा त्याचा नाश केल्याने, उपस्थित करण्यात आलेला वादविषय सुटणार नव्हता. सैतानाने, यहोवाचा एकनिष्ठ सेवक असलेल्या ईयोबाबद्दल असा दावा केला होता की त्याने आपली सर्व संपत्ती गमावल्यास तो देवाला विश्वासू राहणार नाही. ईयोबाने विश्वासू राहून या परीक्षेला यशस्वीपणे तोंड दिले. नंतर, सैतानाने दावा केला की शारीरिक त्रास सहन करावा लागला तर कोणीही मनुष्य देवाकडे पाठ फिरवील. ईयोबाने त्रास सहन केला, पण त्याने आपली एकनिष्ठा भंग होऊ दिली नाही. ईयोब अपरिपूर्ण होता, तरीसुद्धा तो देवाप्रती विश्वासू राहिला. अशा रीतीने, सैतानाचे दावे खोटे असल्याचे ईयोबाच्या बाबतीत सिद्ध झाले. तर मग, देवाच्या इतर उपासकांबद्दल काय म्हणता येईल?
११. येशूने कशा प्रकारे सैतानाचे आरोप खोटे आहेत हे पूर्णपणे सिद्ध केले?
११ सैतानाने कोणतीही परीक्षा आणली तरी, देवाप्रती विश्वासू राहणारा त्याचा प्रत्येक सेवक दाखवतो की त्याच्याबाबतीत सैतानाचे आरोप खोटे आहेत. येशू पृथ्वीवर आला तेव्हा त्याने सैतानाचे आरोप खोटे असल्याचे पूर्णपणे सिद्ध केले. येशू हा आदामासारखा परिपूर्ण होता. त्याने आपल्या मृत्यूपर्यंत विश्वासू राहून हे खातरीलायकपणे सिद्ध केले की सैतान खोटा आहे आणि त्याचे आरोपही खोटे आहेत.—प्रकटी. १२:१०.
१२. यहोवाच्या प्रत्येक सेवकासमोर कोणती संधी आणि जबाबदारी आहे?
१२ सैतान अजूनही यहोवाच्या उपासकांची परीक्षा घेतो. पण, सर्व परिस्थितींत यहोवाला विश्वासू राहण्याद्वारे, आपल्यापैकी प्रत्येकाला हे दाखवून देण्याची संधी आहे की आपण कोणत्याही स्वार्थामुळे नव्हे तर यहोवावर प्रेम असल्यामुळे त्याची सेवा करतो. किंबहुना, ही आपली जबाबदारी आहे. या जबाबदारीकडे आपण कोणत्या दृष्टिकोनाने पाहतो? यहोवाप्रती विश्वासू राहणे हा आपल्याकरता एक विशेषाधिकार आहे असे आपण मानतो. शिवाय, यहोवा आपल्याला धीर धरण्यासाठी बळ देतो आणि ईयोबाप्रमाणेच आपल्या शक्तिपलीकडे तो आपली परीक्षा कधीही होऊ देणार नाही हे जाणून आपल्याला सांत्वन मिळते.—१ करिंथ. १०:१३.
सैतान—मगरूर विरोधक व धर्मत्यागी
१३. ईयोबाचे पुस्तक सैतानाबद्दल आपल्याला असलेल्या माहितीत कशा प्रकारे भर घालते?
१३ इब्री शास्त्रवचनांतून आपल्याला कळते, की कशा प्रकारे सैतानाने आजपर्यंत यहोवाच्या अधिकारास ललकारण्याचा व मानवांना देवापासून दूर नेण्याचा निंदनीय प्रयत्न केला आहे. ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांत, सैतानाने यहोवाच्या केलेल्या विरोधाबद्दल आपल्याला आणखी माहिती मिळते. आणि प्रकटीकरणाच्या पुस्तकातून आपल्याला यहोवाचा सार्वभौम अधिकार कशा प्रकारे कायमचा सिद्ध केला जाईल आणि सैतानाला कशा प्रकारे कायमचे नष्ट केले जाईल ईयो. १:१२; २:७.
हे समजते. ईयोबाचे पुस्तक सैतानाच्या आजवरच्या विद्रोही कृत्यांबद्दल आपल्या ज्ञानात भर घालते. स्वर्गातील सभांमध्ये सैतान उपस्थित व्हायचा तेव्हा तो यहोवाची स्तुती करण्याच्या हेतूने तेथे येत नसे. तर तेथे येण्यामागे दियाबलाचा अतिशय द्वेषपूर्ण व दुष्ट हेतू होता. ईयोबावर आरोप लावल्यावर व त्याची परीक्षा घेण्याची परवानगी मिळाल्यावर बायबल सांगते, की “सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला.”—१४. ईयोबाच्या बाबतीत सैतानाची कशी मनोवृत्ती होती?
१४ सैतान हा मानवांचा निर्दयी शत्रू असल्याचे ईयोबाचे पुस्तक स्पष्टपणे दाखवते. ईयोब १:६ आणि ईयोब २:१ या वचनांत स्वर्गात झालेल्या दोन सभांचे वर्णन केले आहे. या दोन सभांच्या मधल्या काळाचा अवधी बायबलमध्ये सांगितलेला नाही. पण याच काळात सैतानाने ईयोबावर निर्दयीपणे परीक्षा आणल्या. ईयोब या सर्व परीक्षांमध्ये विश्वासू राहिल्यामुळेच यहोवा सैतानाला असे म्हणू शकला: “[ईयोबाचा] विनाकारण नाश करण्यास तू मला चिथविले, तरी तो आपल्या सत्वाला दृढ धरून राहिला आहे.” पण, आपले दावे खोटे ठरल्याचे सैतानाने तरीही मान्य केले नाही. उलट, ईयोबावर आणखी एक कठीण परीक्षा आणण्याची त्याने मागणी केली. अशा रीतीने, ईयोबाच्या समृद्धीच्या काळात तसेच तो कंगाल झाल्यावरही दियाबलाने त्याची परीक्षा घेतली. यावरून, सैतानाला गरीबांबद्दल किंवा संकटे सोसणाऱ्यांबद्दल जराही दयामाया नाही हे स्पष्ट होते. सात्विकतेने चालणाऱ्यांचा तो द्वेष करतो. (ईयो. २:३-५) तरीपण, ईयोबाच्या विश्वासूपणामुळे सैतान खोटा असल्याचे सिद्ध झाले.
१५. आजच्या काळातील धर्मत्यागी कशा प्रकारे सैतानासारखेच आहेत?
१५ सैतान हा धर्मत्यागी बनणाऱ्यांपैकी पहिला होता. आजच्या काळातील धर्मत्यागी व्यक्तींमध्येही दियाबलासारखेच गुण दिसून येतात. मंडळीतील विशिष्ट व्यक्तींची, वडिलांची किंवा नियमन मंडळाची टीका करण्याच्या सवयीमुळे त्यांचे मन कलुषित झाले असण्याची शक्यता आहे. काही धर्मत्यागी यहोवाच्या नावाचा वापर करण्याचा विरोध करतात. यहोवाबद्दल जाणून घेण्यात किंवा त्याची सेवा करण्यात त्यांना रस नाही. त्यांचा पिता सैतान याच्याप्रमाणेच ते सुद्धा सात्विकतेने चालणाऱ्यांना आपले निशाण बनवतात. (योहा. ८:४४) म्हणूनच, यहोवाचे सेवक त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध ठेवू इच्छित नाहीत!—२ योहा. १०, ११.
ईयोबाने यहोवाचे नाव उंचावले
१६. ईयोबाने यहोवाप्रती कशी मनोवृत्ती बाळगली?
१६ ईयोबाने यहोवाच्या नावाचा वापर केला व त्याचे गौरव केले. आपल्या मुलांच्या मृत्यूची धक्कादायक बातमी ऐकल्यावरही ईयोबाने देवाविषयी अनुचित उद्गार काढले नाहीत. आपल्याजवळ जे काही होते ते देवाने नेले असा चुकीचा विचार जरी त्याने केला असला, तरीसुद्धा त्याने यहोवाच्या नावाला धन्य म्हटले. त्याच्या एका सुवचनात त्याने नंतर असे म्हटले: “पाहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय; दुष्टतेपासून दूर राहणे हेच सुज्ञान होय.”—ईयो. २८:२८.
१७. ईयोबाला शेवटपर्यंत विश्वासू राहणे कशामुळे शक्य झाले?
१७ शेवटपर्यंत विश्वासू राहणे ईयोबाला कशामुळे शक्य झाले? निश्चितच, त्याच्यावर संकटे येण्याअगोदरच त्याने यहोवासोबत घनिष्ट नातेसंबंध जोडला होता. सैतानाने उठवलेल्या वादाबद्दल ईयोबाला माहीत होते असे म्हणण्याकरता ईयो. २७:५) देवासोबत असा घनिष्ट नातेसंबंध जोडण्याकरता ईयोबाने काय केले? नक्कीच त्याने अब्राहाम, इसहाक व याकोब या आपल्या दूरच्या नातेवाइकांकडून देवाच्या व्यवहारांबद्दल जे ऐकले होते त्यावर मनन केले असावे. तसेच, यहोवाच्या निर्मितीकृत्यांचे निरीक्षण करण्याद्वारेही ईयोबाला त्याच्या अद्भुत गुणांविषयी समजले असावे.—ईयोब १२:७-९, १३, १६ वाचा.
आपल्याजवळ कोणताही पुरावा नाही. पण तरीसुद्धा, ईयोबाने यहोवाला एकनिष्ठ राहण्याचा दृढनिश्चय केला होता. त्याने म्हटले: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.” (१८. (क) ईयोबाने यहोवाप्रती सुभक्ती कशा प्रकारे प्रदर्शित केली? (ख) आपण कोणकोणत्या मार्गांनी ईयोबाच्या उत्तम उदाहरणाचे अनुकरण करू शकतो?
१८ यहोवाविषयी मिळालेल्या ज्ञानामुळे ईयोबाच्या मनात यहोवाच्या इच्छेनुसार वागून त्याला संतोषविण्याची इच्छा निर्माण झाली. आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या हातून कदाचित देवाला न आवडणारे एखादे कृत्य घडले असेल किंवा त्यांनी “आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल” असा विचार करून ईयोब नियमितपणे बलिदान अर्पण करत असे. (ईयो. १:५) त्याच्यावर अत्यंत कठीण परीक्षा आल्या तरीसुद्धा तो यहोवाबद्दल चांगलेच बोलत राहिला. (ईयो. १०:१२) आपल्यासमोर ईयोबाचे खरोखर किती उत्तम उदाहरण आहे! आपणही यहोवाबद्दल व त्याच्या उद्देशांबद्दल नियमितपणे अचूक ज्ञान घेत राहिले पाहिजे. तसेच अभ्यास, सभांना उपस्थित राहणे, प्रार्थना आणि सुवार्तेचा प्रचार यांसारखी आध्यात्मिक कार्ये आपण नियमितपणे केली पाहिजेत. शिवाय, यहोवाचे नाव सर्वांना कळावे म्हणून आपल्याकडून होता होईल तितका प्रयत्न आपण केला पाहिजे. यहोवाला ज्या प्रकारे ईयोबाच्या विश्वासूपणामुळे आनंद झाला, त्याच प्रकारे आज आपल्याही विश्वासूपणामुळे त्याला आनंद होतो. पुढील लेखात याच विषयावर चर्चा करण्यात आली आहे.
तुम्हाला आठवते का?
• दियाबल सैतानाने ईयोबाला आपले निशाण का बनवले?
• ईयोबाने कोणकोणत्या परीक्षांना तोंड दिले आणि त्याची प्रतिक्रिया काय होती?
• ईयोबाप्रमाणेच शेवटपर्यंत विश्वासू राहण्यास कोणती गोष्ट आपल्याला साहाय्य करेल?
• ईयोबाच्या पुस्तकातून सैतानाबद्दल आपल्याला काय शिकायला मिळते?
[अभ्यासाचे प्रश्न]
[४ पानांवरील चित्र]
सबंध विश्वावर आधिपत्य करण्याच्या देवाच्या अधिकारासंबंधी उठवण्यात आलेल्या वादाकडे ईयोबाचा अहवाल आपले लक्ष वेधतो
[६ पानांवरील चित्र]
कशा प्रकारच्या परिस्थितींत तुमच्या सात्विकतेची परीक्षा होऊ शकते?