व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

होय, ही अभ्यास आवृत्तीच आहे!

होय, ही अभ्यास आवृत्तीच आहे!

होय, ही अभ्यास आवृत्तीच आहे!

टेहळणी बुरूज अभ्यास आवृत्ती अधिक आकर्षक वाटावी व यहोवाच्या मौल्यवान व सत्य वचनाचा अभ्यास करताना तुम्हाला त्याची अधिक मदत व्हावी म्हणून आम्ही अभ्यास आवृत्तीचे स्वरूप बदलले आहे.—स्तो. १:२; ११९:९७.

चार वर्षांपूर्वी, आम्ही टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या प्रकाशित करण्यास सुरुवात केली होती. एक, क्षेत्रातील लोकांसाठी आणि दुसरी, आपल्यासाठी म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांसाठी व आपल्या प्रगतीशील बायबल विद्यार्थ्यांसाठी.

दीर्घ काळापासून यहोवाची सेवा करणाऱ्‍या एका बांधवाने अभ्यास आवृत्तीविषयी बोलताना असे म्हटले: “उत्कृष्ठ व मर्मभेदक—टेहळणी बुरूज नियतकालिकाच्या पहिल्या अभ्यास आवृत्तीविषयी माझी प्रतिक्रिया ही होती. त्यातील गहन आध्यात्मिक भाषेने व विधानांनी थेट माझ्या हृदयाशी संवाद साधला. या अद्‌भुत नवीन तरतुदीबद्दल मनःपूर्वक आभार.” आणखी एका बांधवाने लिहिले: “रेफरन्स बायबलचा उपयोग करून या आवृत्तीचा अभ्यास करण्याची मी आतुरतेनं वाटत पाहत असतो.” आमची आशा आहे, की अभ्यास आवृत्तीबद्दल तुमच्याही भावना अशाच असतील.

तुम्हाला माहीत असेल, की टेहळणी बुरूज (इंग्रजी) हे नियतकालिक सन १८७९ पासून प्रकाशित केले जात आहे. ही विलक्षण कामगिरी, केवळ यहोवाच्या आत्म्यामुळे व आशीर्वादामुळे शक्य झाली आहे. (जख. ४:६) या १३३ वर्षांदरम्यान, सदर नियतकालिकाच्या मुखपृष्ठात अनेक बदल करण्यात आले आहेत. २०१२ साठी, प्रत्येक अभ्यास आवृत्तीच्या मुखपृष्ठावर चित्रकाराने रेखाटलेले साक्षकार्याचे दृश्‍य दाखवणारे एक रंगीबेरंगी चित्र असेल. त्यावरून, यहोवाच्या राज्याविषयी उत्तम साक्ष देण्याच्या देवाच्या आज्ञेची आपल्याला वारंवार आठवून करून दिली जाईल. (प्रे. कृत्ये २८:२३) हे रेखाटन ज्या छायाचित्रावर आधारित आहे ते व त्या चित्रात काय चालले आहे आणि ते दृश्‍य कोणत्या ठिकाणचे आहे याची संक्षिप्त माहिती मुखपृष्ठाच्या आतल्या बाजूला म्हणजे पृष्ठ क्रमांक २ वर तुम्हाला आढळेल. यामुळे, यहोवाचे लोक “सर्व जगात” सुवार्तेचा प्रचार करत आहेत याची सबंध वर्षादरम्यान आपल्या सर्वांना आठवण करून दिली जाईल.—मत्त. २४:१४.

या नियतकालिकात आणखी कोणते बदल करण्यात आले आहेत? उजळणी प्रश्‍नांची चौकट आता अभ्यास लेखाच्या सुरुवातीला दिली आहे. यामुळे, लेख वाचताना व त्याचा अभ्यास करताना कोणत्या मुख्य मुद्द्‌यांकडे लक्ष द्यावे हे ठळकपणे अधोरेखित केले जाईल. अर्थात, टेहळणी बुरूज अभ्यास संचालक नेहमीप्रमाणेच या प्रश्‍नांची उजळणी अभ्यासाच्या शेवटी करतील. तुम्हाला हेही दिसून येईल, की पानांच्या दोन्ही बाजूला पूर्वीपेक्षा अधिक जागा सोडण्यात आली आहे आणि पृष्ठ क्रमांक व परिच्छेद क्रमांक आणखी ठळक करण्यात आले आहेत.

या महिन्याच्या अंकात स्पष्ट केल्याप्रमाणे, यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक इतिहासातील उल्लेखनीय घडामोडींची माहिती देण्यासाठी, “आमच्या संग्रहातून” हे नवीन सदर सुरू करण्यात येत आहे. तसेच, “त्यांनी स्वेच्छेने स्वतःला वाहून घेतले” या शीर्षकाखाली अधूनमधून आपल्या बंधुभगिनींचे वैयक्‍तिक अनुभव प्रकाशित केले जातील. राज्य घोषकांची अधिक गरज असलेल्या क्षेत्रात सेवा केल्यामुळे या बंधुभगिनींना मिळालेल्या आनंदाचे व समाधानाचे बोलके वर्णन या सदरात केले जाईल.

या नियतकालिकाच्या साहाय्याने देवाच्या वचनाचा अभ्यास करण्यात तुम्हाला मनस्वी आनंद मिळो.

प्रकाशक

[३ पानांवरील चित्र]

१८७९

[३ पानांवरील चित्र]

१८९५

[३ पानांवरील चित्र]

१९३१

[३ पानांवरील चित्र]

१९५०

[३ पानांवरील चित्र]

१९७४

[३ पानांवरील चित्र]

२००८