टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) सप्टेंबर २०१३
आपण सुज्ञ निर्णय कसे घेऊ शकतो, यहोवा देवासोबतचा आपला नातेसंबंध दृढ कसा करू शकतो आणि यहोवाच्या सूचनांपासून फायदा कसा मिळवू शकतो या विषयांवर या अंकात माहिती देण्यात आली आहे.
मोलाचे ज्ञान देणारी विरोधदर्शक वाक्ये
येशूने बरेचदा विरोधदर्शक वाक्यांचा उपयोग केला. त्याच प्रकारे, आपणदेखील बायबलमधील सत्यांविषयी जाणून घेण्यास इतरांना मदत करण्यासाठी विरोधदर्शक वाक्यांचा उपयोग करू शकतो.
यहोवाच्या सूचना भरवशालायक आहेत
यहोवाने आपल्या लोकांचे मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच त्यांना सूचना दिल्या आहेत. आज आपण यहोवाच्या सूचनांवर भरवसा का ठेवू शकतो?
यहोवाच्या सूचनांचे आनंदाने पालन करा
आपण यहोवाच्या आज्ञा आनंदाने पाळतो की त्यांना ओझ्यासमान लेखतो? यहोवाच्या सूचनांवर आपला भरवसा आपण कसा वाढवू शकतो?
तुमचे रूपांतर झाले आहे का?
सर्वच ख्रिश्चनांनी “रूपांतर” करण्याविषयी काळजीपूर्वक विचार का केला पाहिजे? या रूपांतरात कशाचा समावेश होतो आणि आपण हे रूपांतर कसे करू शकतो?
जीवनात सुज्ञ निर्णय घ्या
आपले निर्णय देवाच्या इच्छेनुसार आहेत याची खात्री आपण कशी करू शकतो? निर्णय घेतल्यानंतर त्यानुसार वागण्यास आपल्याला कोणती गोष्ट मदत करेल?
पायनियरिंगमुळे देवासोबतचा आपला नातेसंबंध मजबूत होतो
पायनियरिंगमुळे यहोवासोबतचा नातेसंबंध मजबूत कसा होऊ शकतो याचे आठ मार्ग विचारात घ्या. पायनियर सेवेत टिकून राहण्यासाठी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करू शकते?
वाचकांचे प्रश्न
योहान ११:३५ या वचनात सांगितल्याप्रमाणे लाजराचे पुनरुत्थान करण्याआधी येशू का रडला?