टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) नोव्हेंबर २०१३
या जगाचा नाश करण्याबाबत देव दाखवत असलेल्या धीरासाठी आपण कदर कशी दाखवू शकतो? आज यहोवा आणि येशू पृथ्वीवरील त्यांच्या कळपाचे पालनपोषण कसे करतात?
“प्रार्थना करण्यासाठी सावध असा”
खऱ्या ख्रिश्चनांनी सतत प्रार्थना का केली पाहिजे? इतरांसाठी प्रार्थना केल्यामुळे कोणाला फायदा होतो?
इतरांना मदत करण्यासाठी आपण कसा लावू शकतो हातभार?
इतरांच्या शारीरिक व आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी काही जण कोणकोणत्या मार्गांनी यहोवाच्या साक्षीदारांना आर्थिक रीत्या हातभार लावतात त्याबद्दल जाणून घ्या.
आपण “वाट पाहत” राहण्याची वृत्ती कशी जोपासू शकतो?
कोणत्या घटनांवरून दिसून येईल की या दुष्ट जगाचा अंत जवळ आला आहे? देवाच्या धीराबद्दल आपण कृतज्ञता कशी व्यक्त करू शकतो?
जीवन कथा
देवाची सेवा हेच त्याचे औषध!
ओनेस्मस हा जन्मापासूनच ठिसूळ हाडांच्या रोगाने ग्रस्त आहे ज्याला ऑस्टियोजेनेसिस इंपर्फेक्टा असे म्हणतात. बायबलमधील देवाच्या अभिवचनांमुळे त्याला कसे प्रोत्साहन मिळाले?
सात मेंढपाळ, आठ लोकनायक—आज आपल्याकरता कोणता अर्थ राखून आहेत?
हिज्कीया, यशया, मीखा व जेरूसलेममधील सरदार यांनी कशा प्रकारे चांगल्या मेंढपाळांप्रमाणे कार्य केले? आज मीखाच्या ५ व्या अध्यायातील सात मेंढपाळ व आठ लोकनायक कोणाला सूचित करतात?
यहोवाने नेमलेल्या मेंढपाळांचे ऐका
देवाच्या मंडळीचे पालनपोषण करण्यासाठी पवित्र आत्म्याद्वारे मंडळीतील वडिलांना नेमण्यात आले आहे. मेंढरांनी त्यांचे का ऐकले पाहिजे?
वडिलांनो, सर्वात महान मेंढपाळांचे अनुकरण करा
मंडळीतील एखाद्या सदस्याला आध्यात्मिक मदतीची गरज असते तेव्हा वडील कशा प्रकारे साहाय्य पुरवू शकतात? वडील “महान मेंढपाळ” येशू ख्रिस्त याचे अनुकरण कसे करू शकतात?
आपल्या संग्रहातून
“कासवाच्या कवचासारखं माझं घर नेहमीच माझ्यासोबत असायचं”
१९२९ या वर्षाच्या शेवटी आर्थिक स्थिती अचानक खालावली आणि सर्व जगात महामंदी पसरली. अशा परिस्थितीला पूर्ण वेळेचे प्रचारक कशा प्रकारे सामोरे गेले?