टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) एप्रिल २०१४

आपण मोशेप्रमाणे विश्वास कसा दाखवू शकतो हे या अंकात सांगण्यात आले आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्यांप्रती यहोवाचा कोणता दृष्टिकोन आहे आणि आपल्याला त्या पूर्ण करता याव्यात यासाठी तो कशी मदत पुरवतो?

मोशेसारखा विश्वास उत्पन्न करा

मोशेच्या विश्वासामुळे त्याने शारीरिक अभिलाषांकडे पाठ फिरवली आणि देवाच्या सेवेतील जबाबदाऱ्यांची कदर बाळगली. मोशेने आपल्या प्रतिफळावर लक्ष का केंद्रित केले?

“जो अदृश्य आहे त्याला” तुम्ही पाहत आहात का?

देवावर विश्वास असल्यामुळे मनुष्याची भीती बाळगण्यापासून मोशेचे कशा प्रकारे रक्षण झाले आणि त्याला देवाच्या अभिवचनांवर भरवसा ठेवण्यास कशा प्रकारे साहाय्य मिळाले? यहोवाकडे एक खरी व्यक्ती म्हणून पाहण्याकरता आणि तो तुम्हाला साहाय्य करण्यास उत्सुक आहे याची खातरी बाळगण्याकरता आपला विश्वास दृढ करा.

जीवन कथा

पूर्णवेळेच्या सेवेमुळे अनेक आशीर्वाद मिळाले

पूर्णवेळेच्या सेवेच्या ६५ वर्षांकडे मागे वळून पाहताना, आपले जीवन अतिशय समाधानदायक व अर्थपूर्ण होते असे रॉबर्ट वॉलन यांना का वाटते हे जाणून घ्या.

कोणीही दोन धन्यांची चाकरी करू शकत नाही

काही जण परदेशात जास्त पैसे कमावण्यासाठी गेले आहेत. नोकरी करण्यासाठी कुटुंबापासून वेगळे राहिल्यामुळे वैवाहिक जीवनावर, मुलांवर आणि यहोवासोबतच्या आपल्या नातेसंबंधावर कसा परिणाम होतो?

कसलीही शंका व भीती बाळगू नका—यहोवा आपला साहाय्यक आहे!

नोकरीसाठी घरापासून दूर राहिल्यामुळे कुटुंबाची विस्कटलेली घडी एका पित्याने पुन्हा कशी बसवली? वाढत्या महागाईच्या व बेरोजगारीच्या दिवसांत यहोवाने त्याला आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास कशी मदत केली?

यहोवा आपल्यावर प्रेमळपणे नजर ठेवतो, याची तुम्ही कदर करता का?

यहोवा कोणत्या पाच मार्गांनी आपली प्रेमळपणे काळजी घेतो आणि तो वैयक्तिक रीत्या आपल्यावर नजर ठेवतो याचा आपल्याला कसा फायदा होऊ शकतो?

तुम्हाला माहीत होते का?

बायबलच्या काळात जेव्हा एक मनुष्य मुद्दाम आपली वस्त्रे फाडायचा तेव्हा याचा काय अर्थ असायचा?