टेहळणी बुरूज (अभ्यास आवृत्ती) जुलै २०१५
या अंकातील अभ्यास लेखांवर ३१ ऑगस्ट २०१५ ते २७ सप्टेंबर २०१५ या दरम्यान चर्चा करण्यात येईल.
त्यांनी स्वतःला स्वेच्छेनं वाहून घेतलं—रशियामध्ये
रशियात जास्त गरज असलेल्या क्षेत्रात सेवा करण्यासाठी स्थलांतरित झालेल्या अविवाहित बंधुभगिनी आणि विवाहित जोडप्यांविषयी वाचा. यहोवावर पूर्णपणे विसंबून राहण्याविषयी त्यांनी शिकून घेतलं आहे!
आध्यात्मिक नंदनवनाला आणखी सुंदर बनवा!
आध्यात्मिक नंदनवन आणि आध्यात्मिक मंदिर या दोन्ही सारख्याच गोष्टी आहेत का? पौलानं “देवाच्या बागेत” पाहिलेलं नंदनवन काय आहे?
वृद्धापकाळात यहोवाची सेवा करणे
तुम्ही तुमचा विश्वास कसा टिकवून ठेवू शकता आणि यहोवाच्या सेवेत सक्रिय कसे राहू शकता? बायबल काळातील देवाच्या वृद्ध सेवकांनी आनंदानं त्याची सेवा कशी केली याबद्दल जाणून घ्या.
तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे!
मोठं संकट सुरू झाल्यानंतर कोणता संदेश सांगितला जाईल? त्या वेळी अभिषिक्तांसोबत काय होईल?
तुमची मेहनत कोणालाही दिसून येत नाही, तेव्हा काय?
बसालेल आणि अहलियाबाच्या उदाहरणावरून आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजते: इतर कोणीही आपल्या कामाची दखल घेत नसलं तरी यहोवा घेतो.
देवाच्या राज्याला एकनिष्ठ राहा
यहोवा आणि त्याच्या राज्याला एकनिष्ठ राहण्यासाठी ख्रिस्ती स्वतःला प्रशिक्षण कसं देऊ शकतात?
राज्य सभागृहाबद्दल आदर दाखवा
आपण आपल्या उपासनेच्या ठिकाणांची काळजी कशी घेतली पाहिजे? राज्य सभागृहांच्या बांधकामासाठी लागणारे पैसे कसे उभे केले जातात?
तुम्हाला माहीत होतं का?
बायबल सांगतं की अभिवचन दिलेल्या देशातील काही भागात झाडं अगदी विपुल प्रमाणात होती. पण, आज तिथं झाडांचं प्रमाण खूपच कमी आहे. तर मग तिथं खरंच विपुल प्रमाणात झाडं होती का?