व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही इतरांनाही सांगू शकता असे रहस्य

तुम्ही इतरांनाही सांगू शकता असे रहस्य

आपल्या मुलांना शिकवा

तुम्ही इतरांनाही सांगू शकता असे रहस्य

तुम्हाला कधी कोणी रहस्य सांगितले आहे का?— * माझ्याकडे एक रहस्य आहे जे मी तुम्हाला सांगणार आहे. ते पवित्र रहस्य आहे. बायबलमध्ये त्याविषयी असे म्हटले आहे, की हे “रहस्य गतयुगात गुप्त ठेवले होते.” (रोमकर १६:२५) सुरुवातीला फक्‍त देवालाच हे रहस्य माहीत होते. मग देवाने ते रहस्य इतरांनाही कसे सांगितले ते आपण पाहूया.

“पवित्र” या शब्दाचा काय अर्थ होतो हे माहीत आहे का तुला?— पवित्र या शब्दाचा अर्थ, शुद्ध किंवा अगदी खास, असा होतो. तर, हे रहस्य पवित्र आहे याचा अर्थ ते पवित्र देवाकडून आहे. तुला काय वाटते, हे खास रहस्य जाणून घ्यायला कोण उत्सुक होते बरे?— देवदूत. बायबल म्हणते: “त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची उत्कंठा देवदूतांना आहे.” होय, हे पवित्र रहस्य समजून घेण्याची त्यांनाही इच्छा होती.—१ पेत्र १:१२.

येशू जेव्हा पृथ्वीवर आला तेव्हा त्याने लोकांना हे पवित्र रहस्य समजावून सांगितले. त्याने आपल्या शिष्यांना असे म्हटले: “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे.” (मार्क ४:११) या वचनातून तुला कळले का, की हे पवित्र रहस्य कशाविषयी आहे?— ते देवाच्या राज्याविषयी आहे. याच राज्याविषयी येशूने आपल्याला प्रार्थना करायला शिकवले.—मत्तय ६:९, १०.

आता आपण हे पाहू या, की देवाच्या राज्याबद्दलचे रहस्य, ‘गतयुगापर्यंत’ रहस्यच कसे राहिले. आदाम व हव्वेने देवाची आज्ञा मोडल्यामुळे एदेन बागेतून त्यांना हाकलून लावले असले तरी, संपूर्ण पृथ्वीला नंदनवन बनवण्याचा देवाचा उद्देश अजूनही कायम आहे, हे देवाच्या सेवकांना समजले. (उत्पत्ति १:२६-२८; २:८, ९; यशया ४५:१८) देवाच्या राज्यात लोक या पृथ्वीवर कशाचा आनंद लुटणार आहेत त्याबद्दल त्यांनी लिहिले खरे पण हे सर्व कसे घडणार आहे, ते त्यांना माहीत नव्हते. पण, येशू जेव्हा या पृथ्वीवर आला तेव्हा त्याने लोकांना देवाच्या राज्याबद्दलची माहिती समजावून सांगितली.—स्तोत्र ३७:११, २९; यशया ११:६-९; २५:८; ३३:२४; ६५:२१-२४.

आता, देवाच्या राज्यात जो राज्य करणार आहे त्याबद्दल विचार करा. या राज्याचा राजा म्हणून देवाने कोणाला निवडले आहे हे माहीत आहे का तुला?— “शांतीचा अधिपति” असलेल्या त्याच्या पुत्राला, म्हणजे येशू ख्रिस्ताला त्याने राजा म्हणून निवडले आहे. “त्याच्या खांद्यावर सत्ता राहील,” असे बायबलमध्ये म्हटले आहे. (यशया ९:६, ७) तू आणि मी, असे आपण दोघांनी “देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्‍याचे पूर्ण ज्ञान” घेतले पाहिजे. (कलस्सैकर २:२) आपल्याला माहीत असले पाहिजे, की देवाने ज्याला निर्माण केले होते त्या सर्वात पहिल्या देवदूताचे (देवाच्या आत्मिक पुत्राचे) जीवन मरीयेच्या पोटात स्थलांतरीत केले. स्वर्गामध्ये शक्‍तीशाली देवदूत असलेल्या याच पुत्राला देवाने पृथ्वीवर बलिदानासाठी पाठवले. येशूच्या बलिदानामुळेच तर आपल्याला सार्वकालिक जीवन मिळणार आहे.—मत्तय २०:२८; योहान ३:१६; १७:३.

देवाने येशूला त्याच्या राज्याचा राजा म्हणून निवडले आहे या माहितीव्यतिरिक्‍तही आपण या रहस्याविषयी आणखी जाणून घेतले पाहिजे. पवित्र रहस्याचा आणखी एक भाग असा आहे, की इतर स्त्री व पुरुष मृतांतून पुन्हा जिवंत करण्यात आलेल्या येशूबरोबर स्वर्गामध्ये असतील. ते येशूबरोबर स्वर्गातून राज्य करतील.—इफिसकर १:८-१२.

येशूबरोबर राज्य करणाऱ्‍या काहींची नावे आपण पाठ करूयात, बरं का. येशूने आपल्या विश्‍वासू प्रेषितांना सांगितले की तो स्वर्गात त्यांच्यासाठी जागा तयार करायला जात आहे. (योहान १४:२, ३) पुढे दिलेली वचने वाचल्यावर तुला, आपल्या पित्याच्या राज्यात येशूबरोबर राज्य करणाऱ्‍या काही स्त्री-पुरुषांची नावे वाचायला मिळतील.—मत्तय १०:२-४; मार्क १५:३९-४१; योहान १९:२५.

येशूबरोबर स्वर्गात त्याच्या राज्यात किती लोक राज्य करणार आहेत, हे खूप काळपर्यंत माहीत नव्हते. पण आता आपल्याला ती संख्या माहीत झाली आहे. तुला माहीत आहे का?— बायबलनुसार ती संख्या, १,४४,००० इतकी आहे. हासुद्धा पवित्र रहस्याचा भाग आहे.—प्रकटीकरण १४:१, ४.

‘देवाच्या राज्याचे रहस्य’ हे एक आश्‍चर्यकारक रहस्य आहे जे, ज्या कोणाला ते कळेल तो आनंदी होईल, असे तुलाही वाटते का?— मग, आपण या रहस्याबद्दल जितके शिकता येईल तितके शिकून घेऊ या म्हणजे, होता होईल तितक्या लोकांना आपण ते समजावून सांगू शकू. (w१०-E १२/०१)

[तळटीप]

^ तुम्ही हा लेख आपल्या मुलाला वाचून दाखवत असाल तर, लेखात काही वाक्यांच्या पुढे जेव्हा एक छोटीशी रेघ तुम्हाला दिसेल तेव्हा तुम्ही तेथे थांबून तुमच्या मुलाला काय वाटते ते विचारायचे आहे.

प्रश्‍न:

▪ आपण आता ज्या रहस्याविषयी बोललो ते एक रहस्य का आहे, व ते तसे का आहे?

▪ हे रहस्य काय आहे आणि सर्वात आधी कोणी या रहस्याविषयी लोकांना सांगायला सुरुवात केली?

▪ या रहस्याविषयी तू कोणकोणत्या गोष्टी शिकला?

▪ पवित्र रहस्य काय आहे हे तू तुझ्या मित्राला कसे समजावून सांगशील?

[२९ पानांवरील चित्र]

देवदूतांना काय जाणून घेण्याची उत्कंठा लागली होती?