व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

अध्याय ४

तुम्ही घर कसे सांभाळू शकता?

तुम्ही घर कसे सांभाळू शकता?

१. घरची व्यवस्था पाहणे आज इतके कठीण का आहे?

 ‘या जगाचे बाह्‍यस्वरूप बदलत आहे.‘ (१ करिंथकर ७:३१) ते शब्द १,९०० वर्षांपेक्षा आधी लिहिले होते आणि ते आज किती खरे आहेत! विशेषपणे कौटुंबिक जीवनासंबंधी गोष्टी बदलत आहेत. काही ४० अथवा ५० वर्षांपूर्वी ज्याकडे सामान्य आणि पारंपारिक म्हणून पाहिले जात होते त्याचा आज अनेकदा स्वीकार केला जात नाही. या कारणास्तव, घरची व्यवस्था पाहण्यात यशस्वी होणे मोठ्या समस्या सादर करू शकते. तरीसुद्धा, शास्रवचनीय सल्ल्यांकडे लक्ष दिल्यास तुम्हाला त्या आव्हानांना तोंड देता येईल.

आपल्या ऐपतीप्रमाणे राहा

२. कुटुंबात कोणत्या आर्थिक परिस्थिती तणावास कारणीभूत ठरतात?

आज अनेक लोक कुटुंब-केंद्रित असलेल्या साध्या जीवनमानात संतुष्ट नाहीत. व्यापारी जगत अधिकाधिक उत्पादनांची निर्मिती करते आणि जनतेला प्रलोभित करण्यासाठी त्यांच्या जाहिरातबाजीच्या कुशलतेचा उपयोग करते तसे ही उत्पादने खरेदी करता यावीत म्हणून लक्षावधी मातापिता अधिक वेळ काम करतात. इतर लाखो लोकांना केवळ अन्‍नाची गरज भागविण्याकरिता दिवसेंदिवस झटावे लागते. कामात त्यांना पूर्वीपेक्षा बराच वेळ घालवावा लागतो, केवळ आवश्‍यक गोष्टींचा खर्च भागविण्याकरिता त्यांना कदाचित दोन नोकऱ्‍या कराव्या लागतात. नोकरी मिळाल्यामुळे काही जण आनंदी असतील कारण बेरोजगारी सर्वत्र पसरलेली समस्या आहे. होय, आधुनिक कुटुंबाकरिता जीवन नेहमीच इतके सोपे नाही पण परिस्थितीप्रमाणे उत्तम ते करण्यासाठी बायबलची तत्त्वे कुटुंबांना मदत करू शकतात.

३. प्रेषित पौलाने कोणते तत्त्व स्पष्ट केले आणि त्याचा अवलंब केल्याने एखाद्याला यशस्वीपणे घरची व्यवस्था पाहण्यास कशी मदत मिळू शकते?

प्रेषित पौलाने आर्थिक दबाव अनुभवला. आर्थिक दबावांना तोंड देताना त्याने एक अनमोल धडा शिकला, हेच तो आपला मित्र, तीमथ्य याला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट करतो. पौल लिहितो: “आपण जगात काही आणिले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; आपल्याला अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य ६:७, ८) हे खरे की, कुटुंबाला अन्‍नवस्रापेक्षा अधिक गोष्टींची गरज असते. कुटुंबाला राहण्यासाठी जागेची आवश्‍यकता देखील असते. मुलांना शिक्षणाची गरज असते. याशिवाय दवाखान्याचे बिल आणि इतर खर्च असतो. असे असले तरी पौलाच्या शब्दांमधील तत्त्व लागू होते. आपल्या इच्छांचे लाड पुरवण्याऐवजी आपल्या गरजा तृप्त करण्यात आपण समाधानी राहिल्यास जीवन सोपे होईल.

४, ५. दूरदृष्टी आणि योजना करणे यामुळे घराची व्यवस्था पाहण्यास कशी मदत होते?

आणखी एक सहायक तत्त्व येशूच्या एका दृष्टान्तात दिसते. त्याने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) येशू येथे दूरदृष्टीविषयी अर्थात, आगाऊ योजना बनविण्याविषयी बोलत आहे. एक तरुण जोडपे विवाह करण्याचा विचार करते तेव्हा ही गोष्ट कशी मदत करते हे आपण आधीच्या अध्यायात पाहिले आहे. विवाहानंतर, घर सांभाळणे देखील मदतदायक आहे. या क्षेत्रातील दूरदृष्टीमध्ये अंदाजपत्रक असणे, उपलब्ध मिळकतींचा सुज्ञतापूर्वक वापर करण्याची आगाऊ योजना करणे याचा समावेश होतो. अशा रीतीने कुटुंब, जरूरीच्या गोष्टींकरता प्रत्येक दिवशी किंवा आठवडी पैसे बाजूला काढून ठेवून खर्चावर नियंत्रण ठेवू शकते, व आवाक्याबाहेर खर्च करू नये.

काही देशांमध्ये, असे अंदाजपत्रक बनविण्याचा अर्थ, अनावश्‍यक खरेदी करण्याकरता जादा कर्जाने पैसे घेण्याच्या आर्जवाचा प्रतिकार करणे असा होऊ शकतो. इतरांकरता त्याचा अर्थ, क्रेडिट कार्डचा आटोक्याने वापर करणे असा होऊ शकतो. (नीतिसूत्रे २२:७) याचा अर्थ, गरजा किंवा परिणामांना तोलून न पाहता क्षणार्धात एखादी गोष्ट खरेदी करण्याच्या तीव्र इच्छेचा प्रतिकार करणे असा देखील होऊ शकतो. जुगार, धूम्रपान आणि मद्यपानाचा अतिरेक यावर स्वार्थीपणाने पैसे उडविल्याने कुटुंबाच्या आर्थिक स्थितीचे नुकसान होते तसेच ते बायबल तत्त्वाच्याही विरुद्ध जाते, अशा गोष्टींना अंदाजपत्रक आपल्या दृष्टीस आणील.—नीतिसूत्रे २३:२०, २१, २९-३५; रोमकर ६:१९; इफिसकर ५:३-५.

६. दारिद्र्‌यात राहाव्या लागणाऱ्‍यांना कोणते शास्रवचनीय सत्य मदत करते?

पण, नाईलाजामुळे दारिद्र्‌यात राहत असलेल्यांबद्दल काय? एक गोष्ट म्हणजे, ही जागतिक समस्या तात्कालिक आहे हे जाणल्याने त्यांना सांत्वन मिळू शकते. वेगाने जवळ येत असलेल्या नव्या जगात, यहोवा देव मानवजातीची दुर्दशा करणाऱ्‍या इतर सर्व वाईटांसोबत दारिद्र्‌य देखील काढून टाकील. (स्तोत्र ७२:१, १२-१६) या दरम्यान, खरे ख्रिस्ती अतिशय गरीब असले तरी त्यांना पूर्णपणे खिन्‍नता वाटत नाही कारण: “मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही,” या यहोवाच्या अभिवचनावर त्यांचा विश्‍वास आहे. म्हणून एखादा विश्‍वासू आत्मविश्‍वासाने म्हणू शकतो: “प्रभु मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही.” (इब्री लोकांस १३:५, ६) या खडतर काळात, यहोवाचे उपासक जेव्हा त्याच्या तत्त्वांनुसार जगतात व त्याच्या राज्याला त्यांच्या जीवनांत प्रथम स्थान देतात तेव्हा यहोवाने अनेक बाबतींत त्यांना सहयोग दिला आहे. (मत्तय ६:३३) त्यांच्यातील अनेक जण प्रेषित पौलाच्या शब्दांत असे म्हणून पुरावा देऊ शकतात की, “हरएक प्रसंगी अन्‍नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्‍न असणे व विपन्‍न असणे, ह्‍यांचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्‍तिमान आहे.”—फिलिप्पैकर ४:१२, १३.

भार वाहण्यास मदत करणे

७. येशूच्या कोणत्या शब्दांचा अवलंब केला, तर यशस्वी घराण्याची व्यवस्था पाहण्यास मदत मिळेल?

येशूने त्याच्या पार्थिव सेवकपणाच्या शेवटाला असताना म्हटले: “तू आपल्या शेजाऱ्‍यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (मत्तय २२:३९) कुटुंबात या सल्ल्याचा अवलंब केल्याने घरातील व्यवस्था पाहण्यास अधिक मदत होते. शेवटी, पती, पत्नी, पालक आणि मुले—कुटुंबात राहणाऱ्‍या या लोकांशिवाय आपले अधिक जवळचे, आवडते शेजारी कोण आहेत? कौटुंबिक सदस्य एकमेकांना प्रेम कसे दाखवू शकतात?

८. कुटुंबात प्रेम कसे व्यक्‍त केले जाऊ शकते?

प्रत्येक कौटुंबिक सदस्याने घरकामात योग्य मदत करणे हा एक मार्ग आहे. या कारणास्तव, वस्तूच्या वापरानंतर मग ते कपडे किंवा खेळणी असोत योग्य ठिकाणी ठेवण्याचे मुलांना शिकवण्याची गरज असेल. रोज सकाळी बिछाना नीट करण्यासाठी वेळ आणि श्रम लागतील पण घरातील व्यवस्थेत ही मोठी मदत आहे. अर्थातच, काही क्षुल्लक तात्कालिक अस्ताव्यस्तपणा टाळता येऊ शकत नाही पण सर्वजण घर वाजवीपणे टापटिपीत ठेवण्यासाठी व जेवण झाल्यावर सर्वकाही आवरूण ठेवण्यासाठी कार्य करू शकतात. आळशीपणा, चैनबाजी आणि अनिच्छुक, नाखुषीच्या आत्म्याचा सर्वांवर नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. (नीतिसूत्रे २६:१४-१६) दुसऱ्‍या बाजूला पाहता, आनंदी, इच्छुक आत्मा आनंदी कौटुंबिक जीवनाचे पोषण करतो. “संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथकर ९:७.

९, १०. (अ) गृहिणीवर अनेकदा कोणते ओझे लादले जाते आणि ते हलके कसे करता येऊ शकते? (ब) घरकामाचा कोणता समतोल दृष्टिकोन सुचवला आहे?

विचारीपणा आणि प्रेम यामुळे काही घरातील गंभीर समस्या असणारी परिस्थिती टाळण्यास मदत मिळेल. माता, परंपरागत गृहजीवनाच्या प्रमुख आधार राहिल्या आहेत. त्यांनी मुलांची देखभाल केली आहे, घर स्वच्छ केले आहे, कुटुंबाचे कपडे धुतले आहे, अन्‍नसामग्री खरेदी करून स्वयंपाक केला आहे. काही देशांमध्ये, स्रियांनी रिवाजाप्रमाणे शेतात काम करून, बाजारात उत्पन्‍न विकून किंवा इतर मार्गांनी कौटुंबिक अंदाजपत्रकाला हातभार लावलेला आहे. पूर्वी असा रिवाज नसलेल्या ठिकाणी देखील, आवश्‍यकतांमुळे लक्षावधी विवाहित स्रियांना बाहेर नोकरी करण्यास भाग पाडले आहे. या विविध क्षेत्रात काम करणारी पत्नी आणि माता प्रशंसेस पात्र आहे. बायबलमध्ये वर्णन केलेल्या ‘सद्‌गुणी स्त्रीप्रमाणे’ ती अतिशय परिश्रमी आहे. “ती आळशी बसून अन्‍न खात नाही.” (नीतिसूत्रे ३१:१०, २७) तथापि, याचा अर्थ घरचे काम केवळ स्रीच करू शकते असा होत नाही. पती-पत्नी हे दोघे बाहेरील नोकरी करून आल्यावर, पती आणि कुटुंबातील इतर सदस्य आराम करत असताना केवळ पत्नीनेच घरकाम केले पाहिजे का? मुळीच नाही. (पडताळा २ करिंथकर ८:१३, १४.) उदाहरणार्थ, आई जेवण बनविण्याच्या तयारीला लागली असल्यास, कुटुंबातील इतर सदस्यांनी तयारी करण्यामध्ये मदत केल्यास, मेज मांडल्यास, बाजारहाट केल्यास किंवा घरासभोवती स्वच्छता केल्यास आई त्यांची आभारी असेल. होय, सर्वजण ही जबाबदारी वाटून घेऊ शकतात.—पडताळा गलतीकर ६:२.

१० कदाचित काही लोक म्हणतील: “मी राहत असलेल्या ठिकाणी तर पुरुष असे काम करीत नाहीत.” ते खरे असेल पण या गोष्टीवर थोडा विचार करणे चांगले नसणार का? यहोवा देवाने कुटुंबाचा आरंभ केला तेव्हा विशिष्ट काम केवळ स्रियांनाच करावे लागेल असा हुकूम त्याने दिला नव्हता. एके प्रसंगी, विश्‍वासू अब्राहामाला यहोवाकडील खास संदेशवाहकांनी भेट दिली तेव्हा पाहुण्यांच्या जेवणाची तयारी करण्यास व भोजन वाढण्यास अब्राहामने स्वतः मदत केली. (उत्पत्ति १८:१-८) बायबल सल्ला देते: “पतींनी आपआपली पत्नी आपलेच शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीति करावी.” (इफिसकर ५:२८) दिवसाच्या शेवटी, पती थकलेला असतो व त्याला आराम करावासा वाटतो, तेव्हा पत्नीला देखील असेच, कदाचित याहून अधिक असे वाटत नसते का? (१ पेत्र ३:७) मग पत्नीला घरकामात मदत करणे हे पतीकरता उचित आणि प्रेमळपणाचे नसणार का?—फिलिप्पैकर २:३, ४.

११. येशूने घरातील प्रत्येक सदस्यासाठी कोणत्या मार्गाने उत्तम उदाहरण मांडले?

११ देवाला खूष करण्यात आणि सहकाऱ्‍यांना सौख्यानंद देण्यात येशू सर्वोत्तम उदाहरण आहे. येशूचा विवाह झाला नव्हता तरी, तो पती तसेच पत्नी आणि मुलांकरता चांगले उदाहरण आहे. त्याने स्वतःबद्दल म्हटले: “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास,” म्हणजे दुसऱ्‍याची सेवा करावयास आला. (मत्तय २०:२८) ज्या कुटुंबांतील सर्व सदस्य ही मनोवृत्ती विकसित करतात ती कुटुंबे किती आनंदी असतात!

स्वच्छता—इतकी महत्त्वपूर्ण का?

१२. यहोवाची सेवा करणाऱ्‍यांकडून तो कशाची अपेक्षा करतो?

१२ घरातील व्यवस्थेला २ करिंथकर ७:१ मधील आणखी एक बायबलचे तत्त्व मदत करू शकते. तेथे आपण वाचतो: “देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून आपण स्वतःला शुद्ध करू.” या प्रेरित शब्दांचे पालन करणारे “शुद्ध व निर्मळ धर्माचरण” याची अपेक्षा करणाऱ्‍या यहोवाला स्वीकारयोग्य आहेत. (याकोब १:२७) तसेच त्यांच्या घराण्याला त्याजशी संबंधित लाभ मिळतात.

१३. घरातील व्यवस्था पाहण्यामध्ये स्वच्छता महत्त्वपूर्ण का आहे?

१३ उदाहरणार्थ, बायबल यापुढे रोग आणि आजारपण नसेल असा दिवस येईल, याची हमी देते. त्या वेळी, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:४, ५) तथापि, तोपर्यंत, प्रत्येक कुटुंबाला वेळोवेळी आजारपण सहन करावे लागते. पौल आणि तीमथ्य देखील आजारी पडले होते. (गलतीकर ४:१३; १ तीमथ्य ५:२३) तथापि, अनेक आजार टाळता येण्याजोगे असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. सुज्ञ कुटुंबांनी शारीरिक आणि आध्यात्मिक अशुद्धता टाळल्यास, प्रतिबंध करण्याजोग्या आजारपणापासून ती मुक्‍त होतात. ते कशाप्रकारे, याचा विचार आपण करू या.—पडताळा नीतिसूत्रे २२:३.

१४. नैतिक शुद्धता, आजारापासून कुटुंबाचे रक्षण कशा रीतीने करू शकते?

१४ आत्मिक स्वच्छतेमध्ये नैतिक शुद्धतेचा समावेश होतो. बायबल, उच्च नैतिक दर्जांची शिफारस करते आणि विवाहाबाहेरील कोणत्याही प्रकारच्या लैंगिक अनैतिक संबंधाचा धिक्कार करते हे विख्यात आहे. “जारकर्मी, . . . व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरूषसंभोग घेणारे, . . . ह्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.” (१ करिंथकर ६:९, १०) आजच्या अधम जगात राहात असलेल्या ख्रिश्‍चनांसाठी या कडक दर्जांचे पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. असे केल्याने देव संतुष्ट होतो आणि एड्‌स, उपदंश, पूयप्रमेय आणि क्लॅमायडिया अशा लैंगिक संक्रमित आजारांपासून कुटुंबाचे संरक्षण होण्यास देखील मदत मिळते.—नीतिसूत्रे ७:१०-२३.

१५. शारीरिक शुद्धतेच्या अभावामुळे अनावश्‍यक आजारपण येऊ शकते त्याचे एखादे उदाहरण द्या.

१५ ‘देहाच्या सर्व अशुद्धतेपासून’ स्वतःला शुद्ध केल्याने इतर आजारांपासून कुटुंबाचे रक्षण होण्यास मदत होते. शारीरिक अस्वच्छतेमुळे अनेक आजार होतात. याचे प्रमुख उदाहरण धूम्रपानाची सवय हे आहे. धूम्रपान केवळ फुफ्फुस, कपडे आणि हवाच अशुद्ध करीत नाही तर लोकांना देखील आजारी पाडते. धूम्रपान केल्यामुळे दर वर्षी लक्षावधी लोक मरण पावतात. याचा जरा विचार करा; ते ‘देहाच्या या अशुद्धतेपासून’ दूर राहिले असते तर दर वर्षी लक्षावधी लोक आजारी पडून अकाली मृत्युमुखी पडले नसते!

१६, १७. (अ) यहोवाने दिलेल्या कोणत्या नियमामुळे इस्राएल लोकांचे विशिष्ट आजारांपासून संरक्षण झाले? (ब) अनुवाद २३:१२, १३ मागील तत्त्व सर्व घराण्यांत कसे लागू होऊ शकते?

१६ दुसऱ्‍या उदाहरणाचा विचार करा. सुमारे ३,५०० वर्षांआधी इस्राएल राष्ट्राने त्यांच्या भक्‍तीला आणि काही प्रमाणात दैनंदिन जीवनाला संघटित करावे म्हणून देवाने आपले नियमशास्र दिले. त्या नियमशास्राने आरोग्यविषयक काही मूलभूत नियम प्रस्थापित केल्यामुळे त्या राष्ट्राचे आजारापासून संरक्षण करण्यास मदत मिळाली. यातील एक नियम मानवी विष्ठेची विल्हेवाट लावण्याविषयी होता, विष्ठा छावणीच्या बाहेर पूर्णपणे झाकून टाकावयाची होती जेणेकडून लोक राहत असलेले ठिकाण प्रदूषित होणार नव्हते. (अनुवाद २३:१२, १३) तो प्राचीन नियम अजूनही चांगला सल्ला आहे. आज देखील त्या नियमाचे अनुकरण करत नसल्यामुळे लोक आजारी पडून मरत आहेत. *

१७ इस्राएल लोकांच्या नियमामागील तत्त्वाच्या एकवाक्यतेत, कुटुंबाचे आतील अथवा बाहेरील स्नानगृह आणि शौचालय—स्वच्छ आणि निर्जंतूक ठेवले पाहिजे. शौचालय स्वच्छ व झाकून न ठेवल्यास, तेथे माशा गोळा होतील आणि घरात इतर ठिकाणी—आणि आपण खात असलेल्या अन्‍नावर जंतू फैलावतील! मुलांनी व प्रौढांनी शौचाला जाऊन आल्यानंतर आपले हात स्वच्छ धुवावेत. नाहीतर, ते त्यांच्यासोबत त्यांच्या त्वचेवरून जंतू परत आणतील. एका फ्रेंच डॉक्टरांच्या मते “हात धुणे, ही पचन, श्‍वसन किंवा त्वचेचा संसर्ग टाळण्याची अद्यापही एक उत्तम हमी आहे.”

औषधे विकत घेण्यापेक्षा सर्वकाही स्वच्छ ठेवणे स्वस्त पडते

१८, १९. गरीब शेजार असला, तरी घर स्वच्छ ठेवण्याकरता कोणते सल्ले दिले आहेत?

१८ हे खरे की, गरीब शेजारात स्वच्छता एक आव्हान आहे. अशा लोकवस्तींशी चांगले परिचित असलेल्या एका व्यक्‍तीने म्हटले: “अतिउष्ण वातावरण, स्वच्छतेचे काम दुपटीने कठीण बनवते. धुळीच्या वादळामुळे घराच्या भिंतीतील भेगा तपकिरी धुळीने माखून जातात. . . . शहरांतील त्याचप्रमाणे काही ग्रामीण भागातील वाढत्या लोकसंख्येमुळे देखील आरोग्याला धोका निर्माण होतो. उघडी गटारे, गोळा न केलेल्या कचऱ्‍यांचे ढिगारे, घाणेरडी स्थानिक शौचालये, रोग फैलावणारे उंदीर, झुरळं आणि माशा सर्वत्र आढळतात.”

१९ अशा परिस्थितींत स्वच्छता राखणे कठीण आहे. तरीही, असे केल्याने फायदा होतो. साबण, पाणी व थोडे अधिक काम औषधे आणि इस्पितळाच्या बिलांपेक्षा कमी खर्चाचे आहे. अशा वातावरणात तुम्ही राहात असल्यास, शक्यतो, तुमचे घर आणि परिसर प्राण्यांच्या विष्ठेपासून स्वच्छ ठेवा. पावसाळ्यात तुमच्या घरासमोरील रस्त्यावर चिखल होत असल्यास, घरात चिखल येऊ नये म्हणून रस्त्यावर वाळू किंवा दगड तुम्ही टाकू शकता का? बुट किंवा सॅन्डल वापरत असल्यास, घरात जाण्याआधी ते बाहेर काढून ठेवता येऊ शकतात का? तसेच तुमचा पाणी पुरवठा दूषित होऊ देऊ नका. असा अंदाज लावला जातो की, दरवर्षी, दूषित पाणी आणि स्वच्छतेच्या अभावाने होणाऱ्‍या आजारांमुळे सुमारे २० लाख लोक मृत्युमुखी पडतात.

२०. घर स्वच्छ असण्यासाठी, जबाबदारी पूर्ण करण्यास कोणी हातभार लावला पाहिजे?

२० स्वच्छ घर—माता, पिता, मुले आणि पाहुणे या सर्वांवर अवलंबून असते. केनियातील आठ मुलांच्या एका मातेने म्हटले: “सर्व जण त्यांचा भाग पूर्ण करण्यास शिकले आहेत.” एक स्वच्छ, टापटिपीत घर संपूर्ण कुटुंबाविषयी चांगले मत प्रदर्शित करते. एक स्पॅनिश म्हण अशी आहे: “दारिद्रय आणि स्वच्छता यामध्ये कोणताही विरोध नाही.” एखादी व्यक्‍ती हवेलीत, इमारतीत, साध्या घरात किंवा झोपडीत राहत असली तरी, स्वच्छता ही आरोग्यदायक कुटुंबाची गुरूकिल्ली आहे.

उत्तेजन आपल्याला वृद्धिंगत करते

२१. नीतिसूत्रे ३१:२८ च्या एकवाक्यतेत, घरात सौख्यानंद आणण्याकरता काय मदत करील?

२१ नीतिसूत्राचे पुस्तक सद्‌गुणी पत्नीची चर्चा करताना म्हणते: ‘तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो.’ (नीतिसूत्रे ३१:२८) तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची प्रशंसा तुम्ही मागे केव्हा केली आहे? खरेच, वसंतऋतूमधील झुडपांना सौम्य उष्णता आणि ओलावा मिळाल्यावर ती फुलण्याच्या बेतात असतात त्याप्रमाणे आपण आहोत. आपल्यालाही उबदारपणा आणि प्रशंसेची गरज असते. पत्नी घेत असलेल्या परिश्रमाची आणि प्रेमळ काळजीची पती गुणग्राहकता बाळगतो व तो याला क्षुल्लक समजत नाही हे जाणल्याने तिला मदत होते. (नीतिसूत्रे १५:२३; २५:११) घराबाहेरील आणि घरातील पतीच्या कामाची प्रशंसा पत्नी करते तेव्हा ते सुखावह असते. पालक त्यांच्या मुलांच्या घरातील, शाळेतील किंवा ख्रिस्ती मंडळीतील परिश्रमांची स्तुती करतात तेव्हा ती सुद्धा फुलतात. शिवाय, थोडीशी कृतज्ञता किती काही साध्य करू शकते! “आभारी आहे,” असे म्हणण्यास किती किंमत द्यावी लागते? फारच कमी, पण त्यामुळे कौटुंबिक मनोधैर्याच्या रूपात प्रतिफळ अधिक मिळू शकते.

२२. घराणे “मजबूत” होण्यासाठी कशाची गरज असते आणि ते कसे केले जाऊ शकते?

२२ घराची व्यवस्था पाहणे अनेक कारणास्तव सोपे नाही. तरीही, ती यशस्वीपणे पार पाडता येऊ शकते. बायबलचे एक नीतिसूत्र म्हणते: “सुज्ञानाच्या योगे घर बांधिता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते.” (नीतिसूत्रे २४:३) कुटुंबातील सर्वांनी देवाची इच्छा करण्याचे शिकण्याचा आणि त्यांच्या जीवनांत तिचा अवलंब करण्याचा प्रयत्न केल्यास सुज्ञान आणि समंजसपणा मिळवता येऊ शकतो. यासाठी घेतलेल्या प्रयत्नाचे आनंदी कुटुंब हे योग्य फळ आहे!

^ परि. 16 अनेक नवजात बालकांच्या मृत्यूस कारणीभूत होत असलेला सामान्य आजार—अतिसार कसा टाळावा याबद्दल एका पुस्तकात सल्ला देताना जागतिक आरोग्य संघटना म्हणते: “शौचालय नसल्यास: शौचाला घरापासून आणि मुले खेळत असलेल्या ठिकाणापासून दूर जावे व पाणीपुरवठ्यापासून किमान १० मीटर दूर जावे; मातीने विष्ठा झाकून टाकावी.”