जगावर खरंतर कोणाचं नियंत्रण आहे?
तुम्हाला काय वाटतं . . .
-
देवाचं?
-
माणसांचं?
-
की, माहीत नाही कोणाचं?
पवित्र शास्त्र असं शिकवतं
“सगळं जग सैतानाच्या नियंत्रणात आहे.”—१ योहान ५:१९.
“देवाचा मुलगा यासाठीच आला, की त्याने सैतानाची कार्यं उद्ध्वस्त करावीत.”—१ योहान ३:८, नवे जग भाषांतर.
या शिकवणीचा तुम्हाला काय फायदा होईल?
जगातल्या समस्यांवर तर्काला पटेल असं स्पष्टीकरण मिळेल.—प्रकटीकरण १२:१२.
जगात नक्कीच सुधारणा होईल असा विश्वास बाळगायला ठोस कारण मिळेल.—१ योहान २:१७.
पवित्र शास्त्रात जे म्हटलं आहे त्यावर आपण खरंच विश्वास ठेवू शकतो का?
नक्कीच, याची कमीतकमी तीन कारणं आहेत:
-
सैतानाचं राज्य नाश होण्याच्याच मार्गावर आहे. मानवजातीला मुठीत ठेवणाऱ्या सैतानाचा नाश करण्याचं यहोवा देवाने ठरवलं आहे. त्याने ‘सैतानाला नाहीसं’ करण्याचं आणि सैतानामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचं वचन दिलं आहे.—इब्री लोकांना २:१४.
-
यहोवा देवाने येशू ख्रिस्ताला जगावर अधिकारी नेमलं आहे. येशू ख्रिस्त जगावर आत्ता राज्य करत असलेल्या स्वार्थी आणि निर्दयी अधिकाऱ्याच्या अगदी उलट आहे. येशूच्या अधिकाराबद्दल यहोवा असं आश्वासन देतो: “दीनदुबळ्यांवर आणि गरिबांवर तो दया करेल . . . तो त्यांची अत्याचारापासून आणि हिंसेपासून सुटका करेल.”—स्तोत्र ७२:१३, १४.
-
देव खोटं बोलूच शकत नाही. पवित्र शास्त्र देवाबद्दल स्पष्टपणे असं सांगतं: “तो कधीही खोटं बोलू शकत नाही.” (इब्री लोकांना ६:१८) देव एकदा का कुठली गोष्ट करण्याचं वचन देतो तेव्हा ती गोष्ट झाल्यातच जमा असते! (यशया ५५:१०, ११) “या जगाच्या राजाला हाकलून दिलं जाईल.”—योहान १२:३१.
थोडा विचार करा
या जगाच्या अधिकाऱ्याला काढून टाकल्यावर जग कसं असेल?
याचं उत्तर पवित्र शास्त्रातल्या स्तोत्र ३७:१०, ११ आणि प्रकटीकरण २१:३, ४ या वचनांत मिळतं.