अध्याय तेरा
जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन
-
जीवनाबद्दल देवाचा दृष्टिकोन काय आहे?
-
गर्भपाताविषयी देवाचा काय दृष्टिकोन आहे?
-
आपण जीवनाबद्दल आदर कसा दाखवतो?
१. सर्व सजीव सृष्टी कोणी निर्माण केली?
“यहोवा सत्य देव आहे. तो जिवंत देव” आहे, असे यिर्मया संदेष्ट्याने लिहिले. (यिर्मया १०:१०, पं.र.भा.) शिवाय, यहोवा देव सर्व सजीव सृष्टीचा निर्माणकर्ता आहे. स्वर्गातील प्राण्यांनी त्याला म्हटले: “तू सर्व काही निर्माण केले; तुझ्या इच्छेने ते झाले व अस्तित्वात आले.” (प्रकटीकरण ४:११) देवाच्या एका स्तुतीगीतात राजा दावीद म्हणाला: “जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.” (स्तोत्र ३६:९) यास्तव, जीवन ही देवाकडील एक देणगी आहे.
२. आपले पालनपोषण करण्याकरता यहोवा काय करतो?
२ यहोवा आपले पालनपोषण करतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२८) आपण जे अन्न खातो, जे पाणी पितो, श्वासावाटे जी हवा घेतो आणि ज्या भूमीवर राहतो ते सर्व काही त्यानेच आपल्याला दिले आहे. (प्रेषितांची कृत्ये १४:१५-१७) आपण जीवनाचा आनंद लुटावा अशा पद्धतीने त्याने हे सर्व आपल्यासाठी निर्माण केले आहे. पण जीवनाचा पुरेपूर उपभोग घेता यावा म्हणून आपण देवाचे नियम शिकून त्यांचे पालन करण्याची गरज आहे.—यशया ४८:१७, १८.
जीवनाबद्दल आदर दाखवणे
३. हाबेलच्या हत्येकडे देवाने कोणत्या दृष्टिकोनातून पाहिले?
३ आपण आपल्या स्वतःच्या आणि इतरांच्याही जीवनाचा आदर करावा, अशी देवाची इच्छा आहे. जसे की, आदाम आणि हव्वेच्या दिवसांत, त्यांचा पुत्र काईन आपल्या धाकट्या भावावर अर्थात हाबेलावर खूप क्रोधित झाला उत्पत्ति ४:३-८) भावाची हत्या केल्याबद्दल यहोवाने काईनाला शिक्षा दिली.—उत्पत्ति ४:९-११.
होता. यहोवाने काईनाला बजावले होते, की त्याच्या अशा क्रोधामुळे त्याच्या हातून गंभीर पाप घडू शकते. काईनाने देवाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याने “आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले.” (४. मोशेच्या नियमशास्त्रात देवाने, जीवनाबद्दलच्या उचित दृष्टिकोनावर कसा जोर दिला होता?
४ ही घटना होऊन हजारो वर्षे उलटल्यानंतर, यहोवाने इस्राएल लोकांना नियम दिले जेणेकरून ते त्याची सेवा, त्याच्या इच्छेनुसार करतील. मोशेकरवी हे नियम देण्यात आले होते त्यामुळे त्यांना कधीकधी मोशेचे नियम म्हटले जाते. या मोशेच्या नियमांतील एक नियम असा होता: “खून करू नको.” (अनुवाद ५:१७) यावरून इस्राएलांना दिसून आले, की देवाला मानवी जीवनाची कदर आहे आणि लोकांनीसुद्धा इतरांच्या जीवनाची कदर बाळगली पाहिजे.
५. गर्भपाताविषयी आपला काय दृष्टिकोन असला पाहिजे?
५ न जन्मलेल्या बाळाच्या जीवनाविषयी काय? मोशेच्या नियमशास्त्रानुसार, एखाद्याच्या हातून आईच्या उदरातील बाळाचा मृत्यू झाल्यास ते एक पाप होते. होय, न जन्मलेले बाळ देखील यहोवाच्या नजरेत मौल्यवान आहे. (निर्गम २१:२२, २३; स्तोत्र १२७:३) याचाच अर्थ गर्भपात करणे हे एक पाप आहे.
६. आपण आपल्या सहमानवांचा द्वेष का करू नये?
६ जीवनाबद्दल आदर बाळगण्यात, सहमानवांबद्दल उचित दृष्टिकोन बाळगणे समाविष्ट आहे. बायबल म्हणते: “जो कोणी आपल्या बंधूंचा द्वेष करितो तो नरहिंसक आहे; आणि कोणाहि नरहिंसकाच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही, हे तुम्हास माहीत आहे.” (१ योहान ३:१५) आपल्याला सार्वकालिक जीवन हवे असेल तर आपण सहमानवांबद्दल आपल्या मनात असलेला कोणत्याही प्रकारचा द्वेष मुळापासून उपटून टाकला पाहिजे; कारण, द्वेषच बहुतेक हिंसेचे मूळ कारण आहे. (१ योहान ३:११, १२) आपण एकमेकांवर प्रेम करायला शिकले पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
७. जीवनाचा अनादर करणाऱ्या काही सवयी कोणत्या आहेत?
७ आपल्या स्वतःच्या जीवनाचा आदर करण्याविषयी काय? आपण मरावे अशी कोणाचीच इच्छा नसते, पण काही लोक मौजेखातर आपला जीव रोमकर ६:१९; १२:१; २ करिंथकर ७:१) स्वीकारयोग्य पद्धतीने देवाची सेवा करण्याकरता आपण अशा सवयी मोडण्याची गरज आहे. हे खूप कठीण असू शकते परंतु यहोवा आपल्याला आवश्यक ती मदत द्यायला तयार आहे. आणि त्याने दिलेल्या देणगीचा अर्थात आपल्या जीवनाबद्दल आदर दाखवण्याचा आपण प्रयत्न करतो, तेव्हा तो त्याची कदर करतो.
धोक्यात घालतात. उदाहरणार्थ, काही जण तंबाखू, सुपारी किंवा इतर अंमली पदार्थांचे सेवन करतात. यांमुळे शरीराला हानी होते आणि अशा सवयी शेवटी त्यांचा बळी घेतात. जी व्यक्ती स्वतःस अशी व्यसने लावून घेते ती जीवनाला पवित्र समजत नाही. या वाईट सवयी देवाच्या नजरेत अशुद्ध आहेत. (८. आपण सुरक्षिततेची जाणीव बाळगणे महत्त्वाचे का आहे?
८ जीवनाबद्दल आपल्याला आदर असेल तर आपण नेहमी सुरक्षिततेची जाणीव बाळगू. आपण निष्काळजी राहणार नाही आणि मौजेखातर जीवन धोक्यात घालणार नाही. आपण गाडी सुसाट वेगाने चालवणार नाही किंवा घातक अथवा हिंसक खेळांत भाग घेणार नाही. (स्तोत्र ११:५) प्राचीन इस्राएलला देवाने दिलेल्या नियमांत असे म्हटले होते: “तू नवीन घर बांधशील तेव्हा धाब्याला कठडा बांध; नाही तर एखादा मनुष्य तेथून खाली पडल्यास तू आपल्या घराण्यावर हत्येचा दोष आणशील.” (अनुवाद २२:८) या नियमातील तत्त्वानुसार, आपण आपल्या घरातील पायऱ्या सुरक्षित आहेत की नाही हे पाहिले पाहिजे, जेणेकरून कोणीही त्यावरून घसरून, अडखळून पडून जबर जखमी होणार नाही. तुमच्याजवळ गाडी असेल तर ती चालवण्यास सुरक्षित आहे, याची खात्री करा. तुमचे घर किंवा तुमची गाडी, तुमच्या स्वतःसाठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरणार नाही, याची खात्री करा.
९. आपल्याला जीवनाबद्दल आदर असेल तर आपण प्राण्यांशी कसा व्यवहार करू?
९ प्राण्यांच्या जीवनाविषयी काय? प्राण्यांचे जीवनही निर्माणकर्त्याच्या दृष्टीत पवित्र आहे. अन्नासाठी, वस्त्रासाठी किंवा धोका असेल तर संरक्षण मिळावे म्हणून प्राण्यांची कत्तल करण्यास देवाने परवानगी दिली आहे. (उत्पत्ति ३:२१; ९:३; निर्गम २१:२८) परंतु, प्राण्यांशी क्रूरतेने वागणे किंवा मनोरंजनासाठी त्यांची हत्या करणे चुकीचे आहे व याद्वारे, जीवनाच्या पावित्र्याबद्दल घोर अनादर व्यक्त होतो.—नीतिसूत्रे १२:१०.
रक्ताबद्दल आदर बाळगणे
१०. जीवन आणि रक्त यांच्यात संबंध आहे हे देवाने कसे दाखवून दिले?
१० काईनाने हाबेलाची हत्या केल्यानंतर यहोवाने काईनाला सांगितले: “तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे.” (उत्पत्ति ४:१०) देव जेव्हा हाबेलाच्या रक्ताविषयी बोलला तेव्हा खरे तर तो हाबेलाच्या जीवनाविषयी बोलत होता. काईनाने हाबेलाचा जीव घेतला होता आणि आता काईनाला शिक्षा द्यावी लागणार होती. जणू काय हाबेलाचे रक्त यहोवाकडे न्यायाची मागणी करत होते. जीवन आणि रक्त यांच्यातील संबंध, पुन्हा एकदा नोहाच्या दिवसांतील जलप्रलयानंतर दाखवण्यात आला. जलप्रलयाआधी, मानव फक्त फळे, भाजीपाला, धान्ये आणि कवचफळे खात होते. जलप्रलयानंतर यहोवाने नोहा आणि त्याच्या पुत्रांना सांगितले: “सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील; वनस्पति ज्याप्रमाणे तुम्हास दिली होती त्याप्रमाणे सर्व काही आता तुम्हास देतो.” पण देवाने एक मर्यादा घातली: “तथापि मांसाचे जीवन रक्त आहे म्हणून रक्तासकट मांस खाऊ नका.” (उत्पत्ति १:२९; ९:३, ४) यावरून हे स्पष्ट होते, की यहोवाच्या दृष्टीत, एखाद्या प्राण्याचे जीवन आणि रक्त यांत अगदी जवळचा संबंध आहे.
११. नोहाच्या दिवसांपासून देवाने रक्ताच्या कोणत्या वापराविषयी मनाई केली आहे?
११ आपण रक्ताचे सेवन न करता त्याच्याबद्दल आदर असल्याचे दाखवतो. यहोवाने इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिली: “लोकांपैकी कोणी . . . खाण्यालायक पशुची किंवा पक्ष्याची शिकार केली तर त्याने त्याचे रक्त जमिनीवर ओतून मातीने झाकावे. . . . इस्राएल लोकांना मी म्हटले आहे की, ‘कोणत्याहि प्राण्याचे रक्त सेवन करू नये.’” (लेवीय १७:१३, १४) मोशेच्या नियमशास्त्राआधी, ८०० वर्षांपूर्वी, प्राण्याचे रक्त सेवन करू नका, अशी देवाने नोहाला दिलेली आज्ञा अद्यापही लागू होत होती. यहोवाचा दृष्टिकोन साफ होता: त्याचे सेवक प्राण्यांचे मांस खाऊ शकत होते परंतु त्यांनी रक्ताचे सेवन करायचे नव्हते. त्यांना रक्त जमिनीवर ओतायचे होते; दुसऱ्या शब्दांत, प्राण्यांचे जीवन पुन्हा देवाला परत करायचे होते.
१२. पवित्र आत्म्याकरवी पहिल्या शतकात आणि आजही लागू होणारी रक्ताविषयी कोणती आज्ञा देण्यात आली होती?
१२ ख्रिश्चनांना आज अशीच एक आज्ञा देण्यात आली आहे. पहिल्या प्रेषितांची कृत्ये १५:२८, २९; २१:२५) तेव्हा आपण ‘रक्त वर्ज्य केले पाहिजे.’ देवाच्या नजरेत, मूर्तीपूजा आणि लैंगिक अनैतिकता टाळणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच आपण या आज्ञेचे पालन करणेही महत्त्वाचे आहे.
शतकातील प्रेषित व येशूच्या अनुयायांमध्ये पुढाकार घेणारे इतर पुरुष, ख्रिस्ती मंडळीतील सर्वांनी कोणत्या आज्ञांचे पालन करण्याची गरज आहे हे ठरवण्यासाठी एकत्र जमले. ते या निष्कर्षास पोहंचले: “पुढे दिलेल्या जरुरीच्या गोष्टींशिवाय तुम्हावर जास्त ओझे लादू नये असे पवित्र आत्म्याला व आम्हाला योग्य वाटले; त्या म्हणजे मूर्तीला अर्पिलेले पदार्थ, रक्त, गळा दाबून [ज्यामुळे रक्त मांसात राहते] मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी.” (१३. रक्त वर्ज्य करा, या आज्ञेत रक्त संक्रमणाचा देखील समावेश होतो, हे उदाहरण देऊन सांगा.
१३ रक्त वर्ज्य करण्याच्या आज्ञेत रक्त संक्रमणाचा देखील समावेश होतो का? होय. जसे की: डॉक्टर तुम्हाला मद्य असलेली पेये पिऊ नका असे सांगतात. याचा अर्थ, तुम्ही मद्य असलेले पेय फक्त तोंडावाटे घेऊ नये, पण शिरेवाटे तुम्ही ते घेऊ शकता, असा होतो का? मुळीच नाही! तसेच, रक्त वर्ज्य करण्याचा अर्थ, ते कोणत्याही मार्गाने आपल्या शरीरात न घेणे असा होतो. तेव्हा रक्त वर्ज्य करा, या आज्ञेचा असा अर्थ होतो, की आपण शिरेवाटे कोणालाही आपल्या शरीरात रक्त संक्रमण करू देऊ नये.
१४, १५. डॉक्टर जर म्हणाले, की रक्त संक्रमण घेतलेच पाहिजे तर एक ख्रिस्ती व्यक्ती कशी प्रतिक्रिया दाखवेल व का?
१४ समजा एखादा ख्रिस्ती जबर जखमी झाला आहे किंवा त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. अशावेळी डॉक्टर म्हणतील, की त्याला रक्त दिलेच पाहिजे नाहीतर त्याचा मृत्यू होईल. अर्थात त्या ख्रिश्चनाला तर मरावेसे वाटणार नाही. यास्तव, देवाने दिलेली मौल्यवान देणगी अर्थात जीवन वाचवण्याकरता तो इतर सर्व उपचारांचा स्वीकार करेल ज्यांत रक्ताचा गैरवापर केला जात नाही. यास्तव तो, अशाप्रकारचे उपलब्ध असलेले वैद्यकीय उपचार मिळवण्याचा प्रयत्न करील आणि रक्तासाठी पर्याय म्हणून उपलब्ध असलेले निरनिराळे उपचारही स्वीकारेल.
१५ पण या युगात आणखी थोडे दिवस जगता यावे म्हणून एक ख्रिस्ती व्यक्ती देवाचा नियम तोडेल का? येशूने म्हटले: “जो कोणी आपला जीव मत्तय १६:२५) आपण मरू इच्छित नाही. पण आपण जर देवाची आज्ञा मोडून आपले सध्याचे जीवन वाचवण्याचा प्रयत्न केला तर आपण सार्वकालिक जीवन गमावून बसू. तेव्हा, देवाचा नियम उचित आहे असा भरवसा बाळगून आपण सुज्ञता दाखवू. आणि आपण ही खात्री बाळगू की, आपण कोणत्याही कारणामुळे जरी मेलो तरी आपला जीवनदाता पुनरुत्थानाच्या वेळी आपली आठवण करेल व आपल्याला जीवनाची मौल्यवान देणगी पुन्हा देऊ करेल.—योहान ५:२८, २९; इब्री लोकांस ११:६.
वाचवू पाहतो, तो आपल्या जीवाला मुकेल आणि जो कोणी माझ्याकरिता आपल्या जिवाला मुकेल त्याला तो मिळेल.” (१६. देवाच्या सेवकांचा रक्ताविषयी कोणता ठाम निश्चय आहे?
१६ आज, देवाचे विश्वासू सेवक, रक्ताविषयी त्याने दिलेल्या मार्गदर्शनाचे अनुसरण करण्याचा ठाम निश्चय करतात. ते कोणत्याही रूपात रक्ताचे सेवन करणार नाहीत. किंवा वैद्यकीय उपचारांसाठी रक्ताचा स्वीकार करणार नाहीत. * त्यांना ही खात्री आहे, की ज्याने रक्त बनवले त्याला, त्यांचे भले कशात आहे हे चांगल्याप्रकारे माहीत आहे. तुमचाही असाच विश्वास आहे का?
रक्ताचा एकमात्र उचित वापर
१७. प्राचीन इस्राएलात, रक्ताचा कोणता एकमात्र उचित वापर यहोवा देवाला मान्य होता?
१७ मोशेच्या नियमशास्त्रात, रक्ताच्या एकमात्र उचित वापरावर जोर देण्यात आला होता. प्राचीन इस्राएली लोकांकडून अपेक्षिल्या जाणाऱ्या उपासनेविषयी यहोवाने अशी आज्ञा दिली: “शरीराचे जीवन तर रक्तात असते, लेवीय १७:११) इस्राएली लोक पाप करायचे तेव्हा ते निवासमंडपात जाऊन एखादा पशू अर्पून त्याचे रक्त वेदीवर शिंपडून क्षमा मिळवायचे. कालांतराने ही बलिदाने देवाच्या मंदिरात अर्पण केली जाऊ लागली. अशा बलिदानांमध्येच रक्ताचा एकमात्र उचित वापर होता.
आणि तुमच्या जिवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे; कारण . . . रक्तानेच प्रायश्चित्त होते.” (१८. येशूने अर्पण केलेल्या रक्तामुळे आपण कोणता फायदा आणि कोणते आशीर्वाद प्राप्त करू शकतो?
१८ खरे ख्रिस्ती मोशेच्या नियमशास्त्राधीन नाहीत व त्यामुळे त्यांना पशूंचे अर्पण करून त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे लागत नाही. (इब्री लोकांस १०:१) परंतु, प्राचीन इस्राएलातील दिवसांत वेदीवर शिंपडले जाणारे रक्त, एका मौल्यवान बलिदानाला चित्रित करत होते; देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने दिलेल्या बलिदानाला ते चित्रित करत होते. या पुस्तकाच्या पाचव्या अध्यायात आपण शिकलो, की येशूने आपले रक्त अर्पण केले व मानवांसाठी अर्थात आपल्यासाठी त्याचे मानवी जीवन बहाल केले. मग तो स्वर्गात गेला आणि त्याने अर्पण केलेल्या रक्ताचे मोल एकदाच देवाला सादर केले. (इब्री लोकांस ९:११, १२) यामुळे आपल्याला आपल्या पापांची क्षमा मिळण्यासाठी एक आधार मिळाला व सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी मार्ग मोकळा झाला. (मत्तय २०:२८; योहान ३:१६) रक्ताचा तो अत्यंत महत्त्वपूर्ण वापर ठरला आहे! (१ पेत्र १:१८, १९) येशूने अर्पण केलेल्या रक्ताच्या मोलावर विश्वास ठेवल्यावरच आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करता येईल.
१९. “सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी” व्हायचे असेल तर आपण काय केले पाहिजे?
१९ यहोवा देवाने जीवनासाठी केलेल्या या प्रेमळ तरतूदीबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. येशूच्या बलिदानावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन प्राप्त करण्याच्या संधीविषयी आपण इतरांना सांगण्यास प्रवृत्त होऊ नये का? यहोवाला जशी मानवांची काळजी आहे तशी आपल्यालाही सहमानवांच्या जीवनाबद्दल काळजी असेल तर आपण अगदी आवेशाने व उत्साहाने याविषयी लोकांना सांगू. (यहेज्केल ३:१७-२१) आपण हे कार्य मनापासून पूर्ण केले तर, प्रेषित पौलाप्रमाणे आपणही असे म्हणू शकू: “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे; कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही.” (प्रेषितांची कृत्ये २०:२६, २७) देवाबद्दल आणि त्याच्या उद्देशांबद्दल लोकांना सांगणे हा, जीवन व रक्त यांबद्दल परमोच्च आदर दाखवण्याचा उत्तम मार्ग आहे.
^ परि. 16 रक्त संक्रमणाला पर्याय म्हणून असलेल्या उपचारपद्धतींविषयी अधिक माहिती हवी असेल तर यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले रक्ताने तुमचे जीवन कसे वाचू शकते? या माहितीपत्रकातील पृष्ठे १३-१७ पाहा.