व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

पाठ ४

आम्ही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे भाषांतर का काढले?

आम्ही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन हे भाषांतर का काढले?

काँगो (किन्शासा)

रुआंडा

इ.स. तिसऱ्या किंवा चौथ्या शतकातील ग्रीक सिमकस गुंडाळीच्या तुकड्यावरील स्तोत्र ६९:३१ मध्ये देवाचे पवित्र नाव

अनेक दशके यहोवाच्या साक्षीदारांनी वेगवेगळी बायबल भाषांतरे वापरली, त्यांची छपाई केली व त्यांचे वितरण केले. पण लोकांना “सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाची” अधिक चांगली समज मिळण्यास मदत करण्यासाठी आम्हाला हे भाषांतर काढण्याची गरज वाटली. कारण सर्व लोकांना सत्याचे परिपूर्ण ज्ञान मिळावे अशी देवाची इच्छा आहे. (१ तीमथ्य २:३, ४) त्यामुळे मग १९५० साली आम्ही आमच्या आधुनिक भाषेतील बायबलचे, अर्थात इंग्रजीतील न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन याचे काही भाग प्रकाशित करायला सुरुवात केली. या बायबलचे विश्वासू व अचूकपणे १३० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे.

समजण्यास सोपे अशा भाषांतराची गरज होती. भाषा ही वेळेसोबत बदलते, आणि बऱ्याच बायबल भाषांतरांमध्ये वापरलेली भाषा अस्पष्ट, जुनाट व समजण्यास कठीण आहे. तसेच आणखी अचूक प्राचीन हस्तलिखिते सापडली आहेत जी मूळ भाषेतील हस्तलिखितांशी जुळतात. यामुळे बायबलमध्ये वापरलेल्या इब्री, अरामी आणि ग्रीक भाषेची आणखी चांगल्या प्रकारे समज आपल्याला मिळते.

देवाच्या शब्दांना अचूकपणे मांडणाऱ्या भाषांतराची गरज होती. देवप्रेरित शास्त्रवचनांमध्ये फेरफार करण्याऐवजी बायबल भाषांतरकारांनी मूळ भाषेत लिहिलेल्या गोष्टींशी विश्वासू असायला पाहिजे. पण बऱ्याच भाषांतरांमध्ये देवाचे, यहोवा हे पवित्र नाव वापरण्यात आलेले नाही.

बायबलच्या लेखकाला श्रेय देणाऱ्या भाषांतराची गरज होती. (२ शमुवेल २३:२) खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे बायबलच्या सर्वात जुन्या हस्तलिखितांमध्ये यहोवा हे नाव जवळजवळ ७००० वेळा जेथेजेथे आले आहे तेथेतेथे न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन मध्ये यहोवा हे नाव घालण्यात आले आहे. (स्तोत्र ८३:१८, तळटीप) अनेक वर्षांच्या परिश्रमी संशोधनानंतर हे बायबल तयार करण्यात आले आहे. ते देवाचे विचार आपल्याला स्पष्टपणे सांगत असल्यामुळे आपल्याला ते वाचायला आनंद होतो. तुमच्याकडे तुमच्या भाषेत न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन असले किंवा नसले तरीही आम्ही तुम्हा सर्वांना, यहोवाच्या वचनाचे वाचन करण्याची सवय लावण्याचे प्रोत्साहन देतो.—यहोशवा १:८; स्तोत्र १:२, ३.

  • आम्हाला नवीन बायबल भाषांतराची गरज का भासली?

  • देवाच्या इच्छेविषयी शिकणाऱ्याने स्वतःला कोणती सवय लावून घेणे फायदेकारक ठरेल?