व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

शिष्य बनवण्यासाठी

धडा १०

पक्का निश्‍चय करा

पक्का निश्‍चय करा

तत्त्व:  “आम्ही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेशच नाही, तर आमचा जीवही द्यायला तयार होतो, कारण तुम्ही आमच्यासाठी खूप प्रिय बनला होता.”​—१ थेस्सलनी. २:८.

येशूने काय केलं?

१. व्हिडिओ पाहा किंवा योहान ३:१, २ वाचा. मग पुढे दिलेल्या प्रश्‍नांवर विचार करा:

  1.   क. निकदेमने येशूला भेटायला रात्रीची वेळ का निवडली असावी?​—योहान १२:४२, ४३ पाहा.

  2.  ख. येशू निकदेमला रात्री भेटायला तयार होता, यावरून शिष्य बनवायचा येशूचा पक्का निश्‍चय कसा दिसून येतो?

येशूकडून आपण काय शिकतो?

२. आपलं लोकांवर प्रेम असलं तर शिष्य बनवायचा आपला निश्‍चय पक्का असेल.

येशूने केलं तसं करा

३. बायबल विद्यार्थ्याच्या सोयीनुसार आणि वेळेनुसार अभ्यास घ्या. त्याला कदाचित विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वेळी अभ्यास करायचा असेल. त्याला कदाचित त्याच्या कामाच्या ठिकाणी, घरी किंवा बाहेर कुठेतरी अभ्यास करायचा असेल. असं असेल तर, विद्यार्थ्याच्या वेळेनुसार आणि सोयीनुसार त्याच्यासोबत अभ्यास करायला तुम्ही फेरबदल करायचा पुरेपूर प्रयत्न करा.

४. नियमित अभ्यास घ्या. तुम्हाला एखाद्या दिवशी अभ्यास घ्यायला जमणार नसेल, तर विचार करा:

  1.   क. ‘आठवड्याच्या दुसऱ्‍या एखाद्या दिवशी मी अभ्यास घेऊ शकतो का?’

  2.  ख. ‘मी फोनवरून किंवा व्हिडिओ-कॉलवरून अभ्यास घेऊ शकतो का?’

  3.  ग. ‘मी दुसऱ्‍या एखाद्या प्रचारकाला अभ्यास घ्यायला सांगू शकतो का?’

५. योग्य मनोवृत्तीसाठी प्रार्थना करा. बायबल विद्यार्थी कदाचित नियमितपणे अभ्यास करत नसेल किंवा शिकलेल्या गोष्टींनुसार बदल करायला वेळ लावत असेल. अशा वेळी त्याचा अभ्यास घ्यायचा तुमचा निश्‍चय पक्का राहावा यासाठी यहोवाकडे मदत मागा. (फिलिप्पै. २:१३) बायबल विद्यार्थ्यामध्ये बरेचसे चांगले गुण असतील, त्यांवर लक्ष लावायला यहोवाकडे प्रार्थना करा.