क७-घ
येशूच्या पृथ्वीवरच्या जीवनातल्या महत्त्वाच्या घटना—येशूने गालीलमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेलं सेवाकार्य (भाग २)
वेळ |
ठिकाण |
घटना |
मत्तय |
मार्क |
लूक |
योहान |
---|---|---|---|---|---|---|
इ.स. ३१ किंवा ३२ |
कफर्णहूमच्या आसपास |
येशू देवाच्या राज्याबद्दल उदाहरणं देतो |
||||
गालील समुद्र |
नावेतून जाताना वादळ शांत करतो |
|||||
गदारा प्रदेश |
दुष्ट स्वर्गदूतांना डुकरांच्या कळपात पाठवतो |
|||||
कदाचित कफर्णहूम |
रक्तस्रावाने आजारी असलेल्या स्त्रीला बरं करतो; याईरच्या मुलीला जिवंत करतो |
|||||
कफर्णहूम (?) |
आंधळ्यांना आणि मुक्यांना बरं करतो |
|||||
नासरेथ |
त्याच्याच शहरात त्याला पुन्हा नाकारलं जातं |
|||||
गालील |
गालीलचा तिसरा दौरा; प्रेषितांना प्रचारासाठी पाठवून मोठ्या प्रमाणावर सेवाकार्य |
|||||
तिबिर्या |
हेरोद बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं डोकं कापतो; येशूमुळे हेरोदच्या मनात गोंधळ |
|||||
इ.स. ३२, वल्हांडण सण जवळ असताना (योह ६:४) |
कफर्णहूम (?); गालील समुद्राचा उत्तर-पूर्वेकडचा भाग |
प्रेषित प्रचाराच्या दौऱ्यावरून परत येतात; येशू ५,००० पुरुषांना जेवू घालतो |
||||
गालील समुद्राचा उत्तर-पूर्वेकडचा भाग; गनेसरेत |
लोक येशूला राजा बनवायचा प्रयत्न करतात; तो समुद्रावर चालतो; अनेकांना बरं करतो |
|||||
कफर्णहूम |
“मीच जीवनाची भाकर आहे” असं म्हणतो; बरेच जण अडखळतात आणि त्याला सोडून जातात |
|||||
इ.स. ३२, वल्हांडणानंतर |
कदाचित कफर्णहूम |
मानवी परंपरांचा पर्दाफाश करतो |
||||
फेनिके; दकापलीस |
सूरिया प्रांतातल्या फेनिके इथे राहणाऱ्या स्त्रीच्या मुलीला बरं करतो; ४,००० पुरुषांना जेवू घालतो |
|||||
मगदान |
योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं कोणतंच चिन्ह देत नाही |