नीतिवचनं १३:१-२५
१३ बुद्धिमान मुलगा आपल्या वडिलांची शिस्त स्वीकारतो,+पण घमेंडी माणूस* ताडनाकडे* लक्ष देत नाही.+
२ माणूस आपल्या तोंडून निघणाऱ्या शब्दांमुळे चांगल्या गोष्टींनी तृप्त होतो,+पण विश्वासघातकी माणसाच्या जिवाला हिंसेची आवड असते.
३ जो सांभाळून बोलतो, तो आपला जीव वाचवतो,+पण ज्याचा तोंडावर ताबा नसतो, तो नाश ओढवून घेईल.+
४ आळश्याला पुष्कळ गोष्टींची हाव असते, पण तरी त्याच्याजवळ काही नसतं,+मेहनत करणारा* मात्र पूर्णपणे तृप्त होईल.+
५ नीतिमान माणूस खोटेपणाचा तिरस्कार करतो,+पण दुष्टाच्या कामांमुळे त्याला लज्जित आणि अपमानित व्हावं लागतं.
६ निर्दोष मार्गाने चालणाऱ्याचं नीतिमत्त्वामुळे संरक्षण होतं,+पण दुष्टपणा पापी माणसाला खाली पाडतो.
७ एखादा माणूस श्रीमंत असल्याचा दिखावा करतो, पण त्याच्याजवळ काहीही नसतं,+दुसरा गरीब असल्याचं दाखवतो, पण त्याच्याजवळ भरपूर संपत्तीअसते.
८ श्रीमंत माणूस आपल्या जिवाच्या बदल्यात आपली संपत्ती देतो,+पण गरिबाला कोणी साधी धमकीही देत नाही.+
९ नीतिमानाचा प्रकाश तेजस्वीपणे चमकतो,*+पण दुष्टाचा दिवा विझून जाईल.+
१० गर्विष्ठपणामुळे मतभेद होतात,+पण जे सल्ला घेतात,* ते बुद्धिमान असतात.+
११ झटपट मिळवलेली संपत्ती कमीकमी होत जाते,+पण जो हळूहळू साठवतो,* त्याची संपत्ती वाढत जाईल.
१२ अपेक्षा* पूर्ण व्हायला वेळ लागला, तर मन उदास होतं,+पण पूर्ण झालेली इच्छा म्हणजे जीवनाचा वृक्ष!+
१३ जो शिकवण* तुच्छ लेखतो, त्याला दंड भरावा लागेल,+पण जो आज्ञेला मान देतो, त्याला प्रतिफळ मिळेल.+
१४ बुद्धिमानाची शिकवण* म्हणजे जीवनाचा झरा,+ती माणसाला मृत्यूच्या सापळ्यांपासून वाचवते.
१५ ज्याच्याकडे सखोल समज असते त्याच्यावर कृपा होते,पण विश्वासघातकी माणसाची वाट खडतर* असते.
१६ शहाणा माणूस सुज्ञपणे वागतो,+पण मूर्ख आपला मूर्खपणा दाखवून देतो.+
१७ दुष्ट निरोप्या संकटात सापडतो,+पण विश्वासू राजदूतामुळे फायदा होतो.+
१८ शिक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्यावर गरिबी आणि कलंक येतो,पण जो ताडन* स्वीकारतो त्याचा गौरव होईल.+
१९ इच्छा पूर्ण झाल्यामुळे माणसाला आनंद होतो,+पण वाईट गोष्टी सोडणं मूर्खांच्या जिवावर येतं.+
२० बुद्धिमानांसोबत चालणारा बुद्धिमान होईल,+पण मूर्खांची संगत धरणाऱ्याचं नुकसान होईल.+
२१ संकट पापी लोकांची पाठ सोडत नाही,+पण नीतिमानाला समृद्धी मिळते.+
२२ चांगला माणूस आपल्या नातवंडांसाठी वारसा ठेवून जातो,पण पापी माणसाची संपत्ती नीतिमानासाठी साठवलेली असते.+
२३ गरिबाच्या नांगरलेल्या शेतात भरपूर पीक येतं,पण अन्यायामुळे ते हिरावून घेतलं जाऊ शकतं.*
२४ जो काठी आवरतो,* तो आपल्या मुलाचा द्वेष करतो,+पण जो त्याच्यावर प्रेम करतो, तो त्याला शिक्षा करायला चुकत नाही.*+
२५ नीतिमान खाऊन तृप्त होतो,+पण दुष्टाचं पोट रिकामंच राहतं.+
तळटीपा
^ किंवा “सुधारण्यासाठी दिलेल्या सल्ल्याकडे.”
^ किंवा “थट्टा करणारा.”
^ किंवा “करणाऱ्याचा जीव.”
^ शब्दशः “आनंदी होतो.”
^ किंवा “जे एकमेकांशी चर्चा करतात.”
^ शब्दशः “हाताने गोळा करतो.”
^ किंवा “आशा.”
^ किंवा “शब्द.”
^ किंवा “नियम.”
^ किंवा “दुःखांनी भरलेली.”
^ किंवा “सुधारण्यासाठी दिलेला सल्ला.”
^ किंवा “त्या गरिबाचा नाश होऊ शकतो.”
^ किंवा “शिक्षण देत नाही; शिक्षा देत नाही.”
^ किंवा कदाचित, “वेळीच देतो.”