स्तोत्रं १४३:१-१२

  • कोरड्या पडलेल्या जमिनीप्रमाणे देवासाठी तहानलेला

    • “मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन करतो” ()

    • “मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला शिकव” (१०)

    • तुझ्या पवित्र शक्‍तीने मला मार्ग दाखवावा (१०)

दावीदचं गीत. १४३  हे यहोवा, माझी प्रार्थना ऐक;+माझ्या मदतीच्या याचनेकडे लक्ष दे. तुझ्या विश्‍वासूपणामुळे आणि नीतिमत्त्वामुळे मला उत्तर दे.  २  तुझ्या या सेवकाला तुझ्या न्यायासनापुढे आणू नकोस,कारण कोणीही जिवंत माणूस तुझ्यासमोर नीतिमान ठरू शकत नाही.+  ३  शत्रू माझा पाठलाग करतोय;त्याने मला पायांखाली तुडवून धुळीला मिळवलंय. फार पूर्वी मेलेल्या लोकांसारखं, त्याने मला अंधारात राहायला लावलंय.  ४  माझं मन* खचलंय,+माझं हृदय सुन्‍न झालंय.+  ५  मला पूर्वीचे दिवस आठवतात;मी तुझ्या सर्व कार्यांवर मनन* करतो;+तुझ्या हाताच्या कार्यांबद्दल मी विचार करतो.  ६  मी आपले हात तुझ्यापुढे पसरतो;कोरड्या पडलेल्या जमिनीसारखा, माझा जीव तुझ्यासाठी तहानलेला आहे.+ (सेला )  ७  हे यहोवा, माझ्या प्रार्थनेचं लवकर उत्तर दे,+कारण माझी ताकद संपली आहे.+ माझ्यापासून तोंड फिरवू नकोस,+नाहीतर, मीही कबरेत* जाणाऱ्‍यांसारखा होईन.+  ८  पहाटे मला तुझ्या एकनिष्ठ प्रेमाबद्दल ऐकू दे,कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवतो. ज्या मार्गावर मी चाललं पाहिजे तो मला दाखव,+कारण मी तुझ्याकडे वळतो.  ९  हे यहोवा, माझ्या शत्रूंपासून माझी सुटका कर,मी तुझ्या आश्रयाला आलोय.+ १०  मला तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला शिकव,+कारण तू माझा देव आहेस. तुझी पवित्र शक्‍ती* चांगली आहे;तिने मला सपाट जमिनीवर* न्यावं. ११  हे यहोवा, तुझ्या नावासाठी मला जिवंत ठेव. तुझ्या नीतिमत्त्वामुळे मला* संकटातून सोडव.+ १२  तुझ्या एकनिष्ठ प्रेमामुळे, माझ्या शत्रूंचा नाश कर;*+माझा* छळ करणाऱ्‍या सर्वांचा नाश कर,+कारण मी तुझा सेवक आहे.+

तळटीपा

किंवा “धैर्य.”
किंवा “कार्यांचं परीक्षण.”
किंवा “खड्ड्यात.”
किंवा “सरळपणाच्या देशात.”
किंवा “माझा जीव.”
शब्दशः “गप्प कर.”
किंवा “माझ्या जिवाचा.”