गीत ५१
यहोवाला जडून राहू!
१. पराक्रमी याहा, साऱ्या विश्वाच्या नाथा!
तुझ्या थोर न्यायाच्या गातो आम्ही गाथा!
ना एकही शब्द जाई व्यर्थ तुझा!
तुला जडुनी राहू आम्ही सर्वदा,
तुझे राज्य आमुची एकमेव आशा!
२. याहा, तुझ्या राजासना शोभवे नीती,
झळाळे रत्नांची प्रभा तुझ्या सभोती!
लवून वंदितो नम्रभावाने याहा!
तुला जडुनी राहू आम्ही सर्वदा,
तुझ्या सावलीत आसरा नम्र जनां!
३. स्वर्गातही काय सामावेल तुझे वैभव?
तुला मात देणे असे कोणाला संभव?
तुझ्या वचनांवर आम्हा भरवसा!
तुला जडुनी राहू आम्ही सर्वदा,
करू मनोभावे तुझी आराधना!
(अनु. ४:४; ३०:२०; २ राजे १८:६; स्तो. ८९:१४ देखील पाहा.)